प्राधिकरणामध्ये पं. दीनदयाळ उपाध्याय जयंती साजरी

पिंपरी – पिंपरी चिंचवड नवनगर विकास प्राधिकरण कार्यालयात पं. दीनदयाळ उपाध्याय जयंती “अंत्योदय दिवस’ म्हणून साजरी केली. प्राधिकरणाचे नवनियुक्‍त अध्यक्ष सदाशिव खाडे यांच्या हस्ते पं. दीनदयाळ उपाध्याय यांच्या फोटोस पुष्पहार अर्पण करण्यात आला. मुख्य कार्यकारी अधिकारी सतीशकुमार खडके यांनी देखील पुष्पहार अर्पण केला. नगर रचना उप संचालक मधुकर देवडे, अधीक्षक अभियंता अलकनंदा माने, उप मुख्य कार्यकारी अधिकारी प्रकाश अहिरराव, कार्यकारी अभियंता संदीप खलाटे, प्रभाकर वसईकर, उप मुख्य कार्यकारी अधिकारी आशाराणी पाटील, जनसंपर्क अधिकारी वर्षा पवार, तहसीलदार तसेच प्राधिकारणातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. प्राधिकरण अध्यक्ष सदाशिव खाडे यांनी अंत्योदय दिनानिमित्त सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन केले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)