प्राधिकरणात 45 कोटींचे रस्ते

पिंपरी – प्राधिकरण हद्दीत सुमारे 45 कोटी रुपये खर्चून येत्या दोन वर्षात रस्ते विकसित केले जाणार आहेत. अर्थसंकल्पात त्यासाठी तरतूद करण्यात आली आहे. याअंतर्गत विविध पेठांमधील रस्ते जोडले जाणार आहेत.

पिंपरी-चिंचवड नवनगर प्राधिकरण हे शहरात विविध पेठांमध्ये वसले आहे. मात्र, अनेक पेठांमध्ये रस्त्यांची दुरावस्था तसेच काही ठिकाणी रस्ते विकसित न झाल्याने नागरिकांची मोठी गैरसोय होत आहे. प्राधिकरणाने नुकताच अर्थसंकल्प मंजूर केला. त्यात तब्बल 45 कोटी रुपयांची भरीव तरतूद करण्यात आली आहे. पुढील दोन वर्षात प्राधिकरणामार्फत अ आणि ब असे वर्गीकरण करुन रस्ते विकसित करण्याचे काम हाती घेण्यात येणार आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

यामध्ये प्रामुख्याने औंध रस्त्यावर साई चौक येथे समांतर उड्डाणपूल उभारण्यात येणार आहे. यासाठी 5 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. चिंचवड जुना नाका ते रावेत रस्त्यासाठी 15 कोटी रुपये, चिंतामणी चौक ते पॉवर हाऊस 7 कोटी रुपये, पेठ क्रमांक 11 मधील अंतर्गत रस्त्यासाठी 5 कोटी रुपये, चिंचवड जुना नाका ते शिवाजी चौक उर्वरीत 7.5 किलोमीटरच्या रस्त्यासाठी 3 कोटी 75 लाख रुपये, पेठ क्रमांक 29 व 32 ए मधील 24 मीटर व 15 मीटर रस्त्यांच्या कामांसाठी अडीच कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत.

याबरोबरच पेठ क्रमां 39 वाकड येथील रस्ते विकसीत करण्यासाठी 2 कोटी, पेठ क्रमांक 29 रावेत येथील रस्ते विकासीत करण्यासाठी 1 कोटी आणि त्रिवेणीनगर येथील महापालिका हद्दीतील रस्त्यांच्या कामांसाठी 5 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. त्यामुळे, पुढील काळात प्राधिकरण हद्दीत रस्त्यांचे जाळे निर्माण होणार आहे.

प्राधिकरणाच्या यावर्षीच्या अर्थसंकल्पात रस्ते विकासासाठी भरीव तरतूद करण्यात आली आहे. त्यानुसार दर्जेदार काम करुन शहराच्या वैभवात भर टाकणारे रस्ते निर्माण करण्यात येणार आहेत. दोन वर्षात ही कामे पुर्ण करण्याचे उद्दीष्ट्य असले तरी लवकरात लवकर ही कामे मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहेत.
– सदाशिव खाडे, अध्यक्ष, पिंपरी-चिंचवड नवनगर प्राधिकरण.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)