प्राधिकरणात उद्या एकता दौड

पिंपरी – राष्ट्रीय एकता दिनी म्हणजे सरदार वल्लभभाई पटेल यांच्या वाढदिवशी उद्या दि. 31 ला शहरात एकता दौडचे आयोजन केले आहे. स्पाईन रोड, चिंतामणी चौक, वाल्हेकरवाडी ते भेळ चौक एकता दौड आहे. सकाळी साडे सहा वाजता आमदार लक्ष्मण जगताप दौडला हिरवा झेंडा दाखवतील. दौडमध्ये विद्यार्थी, खेळाडू, युवक, युवती व नागरिकांनी मोठ्या प्रमाणात सहभागी व्हावे, असे आवाहन संयोजक नगरसेवक नामदेव ढाके व शीतल शिंदे यांनी केले. केंद्र सरकारने हा उपक्रम 2014 ला सुरू केला. तेव्हा पासून पिंपरी-चिंचवड शहरातही दौड आयोजित केली जाते.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)