प्राधिकरणाच्या जागेत संविधान भवन

पिंपरी – देशातील पहिले संविधान भवन औद्योगिकनरीत उभारण्यात येणार आहे. त्यासाठी पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाने मोकळा भूखंड उपलब्ध करावा, अशी मागणी आमदार महेश लांडगे यांनी प्राधिकरणाकडे केली आहे.

देशभरात आज संविधान दिनानिमित्त संविधानाचा जागर केला जात आहे. संविधान दिनाचे औचित्य साधत आमदार लांडगे यांनी नगरसेवकांच्या शिष्टमंडळासह आज (सोमवारी) प्राधिकरणाचे अध्यक्ष सदाशिव खाडे यांची भेट घेऊन संविधान भवनासाठी जागा देण्याची मागणी केली. यावेळी महापौर राहुल जाधव, नगरसेवक विकास डोळस, लक्ष्मण उंडे, सागर गवळी, राजेंद्र लांडगे, कुंदन गायकवाड, उत्तम केंदळे, नगरसेविका भीमाबाई फुगे, हिराबाई घुले, साधना मळेकर, सुवर्णा बुर्डे, स्वीनल म्हेत्रे, कमल घोलप, यशोदा बोईनवाड, निर्मला गायकवाड, नम्रता लोंढे, सारिका लांडगे, योगिता नागरगोजे आदी उपस्थित होते. याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची देखील आमदार महेश लांडगे यांनी भेट घेतली होती. शहरात संविधान उभारण्याबाबत मुख्यमंत्री देखील सकारात्मक आहेत.

-Ads-

आमदार लांडगे म्हणाले, भारत देश हा जगातील सर्वात मोठा लोकशाही असलेला देश आहे. विविध धर्म, जात, पंथ असूनही संविधानाने हा देश एकसंध बांधलेला आहे. या संविधानाविषयी प्रत्येक भारतीयाला साक्षर करणे गरजेचे आहे. त्यासाठी भारतातील पहिले संविधान भवन उभारावे. यासाठी प्राधिकरणातील जागा मिळावी. शहराच्या मध्यभागावर उभारणी झाल्यास संविधानाविषयी जागरुकता होण्यास मदत होईल. प्राधिकरणाकडे मोठ्या प्रमाणात मोकळे भूखंड आहेत. प्राधिकरणाच्या मोकळ्या भूखंडावर देशातील पहिले संविधान भवन उभारण्यासाठी जागा देण्यात यावी.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी देशाला आदर्श संविधान दिले आहे. संविधानामुळे आपला भारत देश एकसंध आहे. या संविधानाविषयी प्रत्येक भारतीयाला साक्षर करण्याची आवश्‍यकता आहे. भारतात कोठेही मसंविधान भवन नाही. महाराष्ट्राला आणि पिंपरी-चिंचवड शहराला त्याचा मान मिळणार आहे. शहराच्या मध्यभागात संविधान भवनाची उभारणी झाल्यास संविधानाविषयी जागरुकता निर्माण होण्यास मदत होईल. या संविधान भवनाच्या माध्यमातून संविधानाची जनजागृती करण्यात येईल. संविधान भवन झाल्यास भारतातील पहिले भवन शहरात असणार आहे. यामुळे शहराची मान उंचावणार आहे. सकारात्मक दृष्टीकोनाने विचार करुन संविधान भवनासाठी जागा देण्यात यावी, असेही आमदार लांडगे म्हणाले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)