प्राधिकरणाचे विलनीकरण महापालिकेत करा

  • महापौर काळजे यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

पिंपरी, (प्रतिनिधी) – पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणा (पीसीएनटीडीए) चे विलनीकरण पुणे महानगर क्षेत्र विकास प्राधिकरणा (पीएमआरडीए) त करण्याबाबत मुख्यमंत्र्यांच्या बैठकीत सोमवारी (दि.26) चर्चा झाली. मात्र, प्राधिकरणाचे विलनीकरण पीएमआरडीएऐवजी पिंपरी-चिचंवड महापालिकेत करावे, अशी मागणी महापौर नितीन काळजे यांनी केली आहे.

महापौर नितीन काळजे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना याबाबत पत्र पाठविले आहे. त्यात म्हटले आहे की, नवनगर विकास प्राधिकरणाचे मोठे क्षेत्र आहे. तेथील बहुतांश विकास, नागरी समस्या आणि मुलभूत सुविधा महापालिकेशी संलग्न आहेत. यातील काही बाबतीत अजुनही निर्णय झालेला नाही. शेतक-यांच्या बाधित जमिनींचा परतावा अजूनही प्रलंबित आहेत. त्यामुळे प्राधिकरणाचे क्षेत्र पीएमआरडीएमध्ये विलगीकरण करणे सोयीची ठेरणार नाही. त्याचे विलनीकरण पिंपरी-चिंचवड महापालिकेत करणे नागरिकांच्या दृष्टीने सोयीचे ठरेल.

त्यानुसार शासनाकडून निर्णय व्हावा, असे महापौर काळजे यांनी नमूद केले आहे. दरम्यान, मुख्यमंत्र्यांनी सोमवारी पीएमआरडीएच्या बैठकीत या विलनीकरणाबाबत चर्चा केली आहे. त्यानंतर भाजपच्या महापौरांनी प्राधिकरणाचे विलनीकरण महापालिकेत करण्याची मागणी केली आहे. त्यामुळे शासन काय निर्णय घेणार, हे पाहावे लागणार आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)