प्राधिकरणाचा अवैध बांधकामांवर हातोडा

– रिंग रोड बाधित बांधकामे
पिंपरी, (प्रतिनिधी) – पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाच्या अतिक्रमण विभागाने आज (शनिवारी) सकाळी काळेवाडी, रहाटणी परिसरातील रिंग रोडवरील अनधिकृत बांधकामांवर धडक कारवाई सुरु केली आहे. प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी सतिशकुमार खडके यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.

प्राधिकरणाने रिंग रोडमधील मुख्य रस्ते मोकळे करण्याचे धोरण हाती घेतले आहे. त्याअंतर्गत ही कारवाई सुरु आहे. काळेवाडी, रहाटणी परिसरात प्राधिकरणाच्या रिंग रोडवर मोठ्या प्रमाणात अनधिकृत बांधकाम झाले आहेत. त्यामध्ये रहिवाशी घरे, शाळा, दुकाने, गोडावून अतिक्रमणातील हटवली आहेत. सुरुवातीच्या टप्प्यात 25 अतिक्रमणे काढण्यात येणार आहेत. उद्या (रविवार) 25 अतिक्रमणे हटवली जाणार आहेत.

रहाटणी येथील सर्व्हे नंबर 25 फेज 1 येथून शनिवारी सकाळी नऊ वाजल्यापासून कडक पोलीस बंदोबस्तात रिंग रोडवरील अनधिकृत बांधकामे पाडण्यास सुरुवात केली असल्याचे, प्राधिकरणाचे उपअभियंता झोनल अधिकारी वंसत नाईक यांनी सांगितले. तीन पोकलेन, दोन जेसीबी, प्राधिकरणाचे पोलीस, वाकड ठाण्याचे पोलीस यांच्या सहकार्याने ही कारवाई सुरु आहे. यावेळी उपमुख्यकार्यकारी अधिकारी प्रशांत अहिरराव, उपअभियंता नाईक यांचे पथक ही कारवाई करत आहे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)