प्राधिकरणबाधितांचे मुख्यमंत्र्यांना साकडे

पिंपरी – सन 1972 ते 1984 दरम्यान पिंपरी – चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाच्या (पीसीएनटीडीए) भूसंपादन बाधीत शेतकऱ्यांचा साडेबारा टक्के जमीन परताव्याचा गेल्या 20 वर्षापासूनचा प्रलंबित असलेला प्रश्न निकाली काढण्यात यावा, अशी मागणी करण्यात आली आहे.

निगडी-आकुर्डी-वाल्हेकरवाडी गावातील भूसंपादन बाधीत शेतकऱ्यांच्या वतीने ऍड. राजेंद्र काळभोर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन पाठविले आहे. पीसीएनटीडीएने भूसंपादन बाधीत भूमिपुत्र शेतकऱ्यांसाठी साडेबारा टक्के जमीन वाटपासाठी ठराव मंजूर करून 1 ऑगस्ट 2001 रोजी राज्य सरकारकडे पाठविला. परंतु, आजतागायत साडेबारा टक्के जमीन वाटपाबाबत सरकारी अध्यादेश जारी झालेला नाही. सर्वोच्च न्यायालयाच्या मार्गदर्शक तत्त्वानुसार, भुसंपादन बाधीत शेतकऱ्यांना संपादीत जमिनीचा साडेबारा टक्के हिस्सा वाटप करण्याचे धोरण सरकारने अंगिकारले. पहिल्यांदा 1993 नंतर आणि दुसऱ्यांदा 1984 च्या शेकऱ्यांसाठी अंमलबजावणी करण्यात आली. मात्र, 1972 ते 1984 दरम्यान जमिनीचे स्वखुशीने ताबे देणाऱ्या शेतकऱ्यांना वगळून साडेबारा टक्के जमीन परताव्याचे निर्णय घेण्यात आले. गेली चार वर्षे या अन्यायाविरोधात बाधीत शेतकरी मोर्चे, आंदोलने याद्वारे सरकारचे लक्ष वेधत आहे. मात्र, त्याकडे दुर्लक्ष होत आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

काही शेतकऱ्यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली. या दाव्यावर 25 ऑक्‍टोबर 2018 रोजी झालेल्या अंतिम सुनावणीत साडेबारा टक्के जमीन परताव्याचा निर्णय येत्या आठ आठवड्यात घ्या, असे आदेश न्यायालयाने सरकारला दिले. मात्र, राज्याच्या नगरविकास विभागाच्या सह सचिवांनी चुकीच्या माहितीच्या आधारे साडेबारा टक्के जमीन परताव्याबाबत फेरविचार करण्याची बाब सरकार स्तरावर विचाराधीन नाही, असे पत्र सरकारी वकीलास पाठविले. शेतकऱ्यांकडून ताब्यात घेतलेल्या जमिनीचे पीसीएनटीडीएला योग्य व्यवस्थापन करता न आल्याने गेल्या 20 वर्षात सुमारे 500 हेक्‍टर संपादीत जागेवर अतिक्रमणे झाली. या पत्रात सकारात्मक दुरूस्ती करून 20 वर्षापासून प्रलंबित असलेला हा प्रश्न निकाली काढावा, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)