प्रादेशिक सेनेमध्ये सेवा बजावलेल्या जवानांना पेन्शन देण्याची मागणी

     खासदार धनंजय महाडिक यांनी घेतली संरक्षण राज्यमंत्र्यांची भेट

कोल्हापूर-  प्रादेशिक सेनेमध्ये सेवा बजावलेल्या आणि 1989 सालापूर्वी निवृत्त झालेल्या जवानांना अजूनही पेन्शन मिळत नाही. भारताच्या सुरक्षेसाठी आणि अखंडतेसाठी आजवर झालेल्या अनेक छोट्यामोठ्या युद्धांमध्ये प्रादेशिक सेनेच्या जवानांनी मोलाची आणि शौर्यदायी कामगिरी केली आहे. तरीही कायद्यातील तरतुदीचा विपर्यास करुन, 1989  पूर्वी निवृत्त झालेल्या जवानांना पेन्शन पासून वंचित ठेवले जात आहे. या पार्श्‍वभूमीवर प्रादेशिक सेनेतून निवृत्त झालेल्या माजी सैनिकांनी कोल्हापूरचे खासदार धनंजय महाडिक यांच्या नेतृत्वाखाली देशाचे संरक्षण राज्यमंत्री सुभाष भांबरे यांची नवी दिल्लीत भेट घेतली. प्रादेशिक सेनेच्या निवृत्त जवानांना पेन्शन आणि अन्य सुविधा मिळाव्यात, अन्यथा 15 एप्रिल 2018 नंतर व्यापक आंदोलन छेडले जाईल, असा इशारा  यावेळी महाडिक यांनी दिलाय.

प्रादेशिक सेनेतून देशसेवा केलेल्या आणि 1989 पूर्वी निवृत्त झालेल्या या मंडळींची व्यथा-वेदना सरकार दरबारी समजून घेतली जात नाही.1962 च्या भारत-चीन युद्धात, 1965 च्या भारत-पाकिस्तान युद्धात, दीव दमण इथल्या गोवा मुक्ती संग्राममध्ये प्रादेशिक सेनेच्या तत्कालिन जवानांनी सहभाग घेतला होता. तर 1971  च्या भारत-पाकिस्तान युद्धात सुमारे 1 लाख पाकिस्तानी युद्धकैद्यांवर पहारा ठेवण्याचे कामही प्रादेशिक सेनेच्या जवानांनी केले होते.

युद्धकाळातील शौर्यदायी कामगिरीबद्दल राष्ट्रपतींकडून अनेकांना गौरवचिन्ह, सन्मानपत्र मिळाली आहेत. कारगील युद्धावेळी सुद्धा अंतर्गत सुरक्षेचे काम या जवानांनी पार पाडले. तरीही प्रादेशिक सेनेतील माजी जवानांचे जगणे सध्या मुश्कील झाले आहे. माजी सैनिक म्हणून ओळखपत्र नाही, कॅन्टीन सुविधा नाही, पेन्शन नाही. त्यामुळे अनेक माजी सैनिकांना जगणे मुश्कील झाले आहे. या पार्श्‍वभूमीवर या माजी सैनिकांना पेन्शन द्यावी या मागणीकरता  खासदार धनंजय महाडिक यांनी  संरक्षण राज्यमंत्री सुभाष भांबरे यांची भेट घेतली.

 


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)