प्राथमिक शिक्षक संघाची खटाव तालुका कार्यकारिणी जाहीर

वडूज: खटाव तालुका शिक्षक संघाची नूतन कार्यकारिणी जाहीर झाल्यानंतर जल्लोष करताना नवनिर्वाचित पदाधिकारी व समर्थक कार्यकर्ते.

वडूज, दि. 27 (प्रतिनिधी)- खटाव तालुका प्राथमिक शिक्षक संघाची सहविचार बैठक नुकतीच वडूज येथील स्वाध्याय भवनमध्ये पार पडली. या बैठकीत सर्वानुमते नूतन कार्यकारिणी निवडण्यात आली. यावेळी अध्यक्षपदी सूर्यकांत बाळू कदम, नेतेपदी पोपट ईश्‍वरा कारंडे, सरचिटणीसपदी प्रवीण गोसावी, कार्याध्यक्षपदी शहाजी खाडे, कोषाध्यक्षपदी शरद शेटे यांच्या निवडी करण्यात आल्या. याशिवाय संपर्कप्रमुखपदी राजाराम मदने, सहसचिवपदी राजेंद्र फडतरे, प्रसिद्धीप्रमुखपदी शंकर देशमाने, कार्यकारिणीमध्ये सचिन शिंदे, ज्ञानेश्‍वर धायगुडे यांना नियुक्तीपत्रे देण्यात आली. जिल्हा कोषाध्यक्ष समीर बागवान यांनी वरील नियुक्‍त्या जाहीर केल्या. यावेळी शिक्षक बॅंकेचे माजी संचालक सुनील सावंत, माजी तालुकाध्यक्ष अंकुशराव शिंदे, बंडोबा शिंदे, गौतम कोकाटे, अर्जुन जाधव, उमेश पाटोळे, देवीदास ढोले, चंद्रहार खाडे आदी कार्यकर्ते उपस्थित होते.
आमदार बाळासाहेब पाटील, प्रभाकर घार्गे, सभापती संदीप मांडवे, उपसभापती कैलास घाडगे, संभाजीराव थोरात, सिद्धेश्‍वर पुस्तके, महेंद्र जानुगडे, राजेंद्र बोराटे, बॅंकेचे अध्यक्ष बळवंत पाटील, उपाध्यक्ष मोहनराव निकम आदींसह मान्यवरांनी नूतन कार्यकारिणीचे अभिनंदन केले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)