प्राथमिक शिक्षक बॅंकेचे कामकाज कौतुकास्पद: संजीवराजे नाईक निंबाळकर

सातारा – प्राथमिक शिक्षकांची अर्थवाहिनी असणाऱ्या सातारा शिक्षक बॅंकेचे कार्य जिल्हयातील सहकार क्षेत्रासाठी कौतुकास्पद आहे. शिक्षक बॅंकेला 71 वर्षे पूर्ण झाली असून जिल्हा परिषदेच्या अगोदर शिक्षक बॅंकेची स्थापना होवून सद्यस्थितीत कर्मचाऱ्यांचे बॅंकेत शिक्षक बॅंक ही महाराष्ट्रात आदर्शवत असल्याचे गौरवोद्गार जिल्हा परिषद साताराचे अध्यक्ष संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी बॅंकेच्या सभागृहात झालेल्या सत्कार समारंभ प्रसंगी काढले.

महाराष्ट्र राज्य खो-खो असोसिएशनच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल जिल्हा परिषद अध्यक्ष संजीवराजे नाईक निंबाळकर, गुणगौरव पुरस्कार मिळाल्याबद्दल महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाचे संपर्क प्रमुख सिद्धेश्‍वर पुस्तके यांचा बॅंकेच्या वतीने बॅंकेचे अध्यक्ष राजेंद्र घोरपडे यांच्या हस्ते भेटवस्तू व शाल श्रीफळ देवून सत्कार करण्यात आला.

यावेळी शिक्षक बॅंक, समाजाचे व प्राथमिक शिक्षकांची आर्थिक गरज, अडचणी, शिक्षकांसाठी कर्जे, सेवानिवृत्त सभासदांना व आजारपणीची भरीव मदत, सेवानिवृत्त शिक्षकांचा यथोचीत सत्कार, व कौतुक सोहळा बॅंकेमार्फत केला जातो याची त्यांनी प्रशंसा केली. बॅंकेच्या विद्यमान संचालक मंडळ, बॅंकेचा कारभार काटकसरीपणे व सभासदाभिमुख करत असलेचे संजीवराजे नाईक निंबाळकर आवर्जुन सांगीतले तसेच प्राथमिक शिक्षकांचे प्रश्‍न सोडविणेसाठी शिक्षक संघास आम्ही सहकार्य करू असेही म्हणाले.

बॅंकेचे अध्यक्ष राजेंद्र घोरपडे यांनी बॅंकेची वसूली वेळेवर मिळत नसल्याबाबत व शासनाच्या नियमाप्रमाणे बॅंकेचे सभासद असणारे कर्जदार शिक्षकांच्या बदल्या जिल्हाबाहय झाल्यामुळे वसूली संदर्भात अडचणी येतात असे सांगितले. शिक्षकांचे पगार वेळेत व्हावेत, शिक्षकांना त्वरित पदोन्नती मिळावी व महिला शिक्षकांच्या गैरसोयीच्या झालेल्या बदल्या सोईच्या ठिकाणी व्हाव्यात याबाबत सहकार्य करण्याची विनंती केली.

यावेळी बोलताना सिद्धेश्‍वर पुस्तके यांनी बॅंकेने केलेल्या सत्काराबद्दल आभार मानले. बॅंकेने प्राथमिक शिक्षकांकरीता आगामी काळात आणखी सोई सुविधा उपलब्ध करून द्याव्यात असे आवाहन केले. यावेळी सातारा जिल्हा प्राथमिक शिक्षक संघाचे सरचिटणीस राजेंद्र बोराटे यांनी सातारा जिल्हा परिषदेने शिक्षकांचे पगार वेळेत 1 ते 10 तारखेपर्यंत करावेत, जिल्हयात रिक्‍त असलेली विस्तारा अधिकारी, केंद्रप्रमुख, पदविधर शिक्षक, मुख्याध्यापक पदे त्वरित भरावीत, जादा झालेल्या शिक्षकांचे समायोजन करताना त्यांना स्वतालुक्‍यात जाण्याची संधी द्यावी आदी मागण्यांबाबत जिल्हा परिषद अध्यक्ष संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी लक्ष घालून त्या सोडवाव्यात अशी मागणी केली. यावेळी शिक्षक बॅंकेचे संचालक शंकर जांभळे यांनी मनोगत व्यक्‍त केले.

कार्यक्रमास जिल्हा परिषद सदस्य धैर्यशील अनपट, शिक्षण तज्ञ जि. प. सदस्य रूपेश जाधव, नवनाथ भरगुडे, शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष महेंद्र जानुगडे, राजेंद्र बोराटे, विक्रम डोंगरे, समीर बागवान, प्रविण घाडगे, ज. शा. यादव, रामचंद्र लावंड, सुभाषराव शेटे, तुकाराम ढगे, शिवाजीराव जाधव, अनिल जायकर, सुनिल सावंत, सुनिल खंडाईत आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमप्रसंगी शिक्षक दिनाचे औचित्य साधून महाराष्ट्र राज्य आदर्श प्राथमिक पुरस्कार विजेते प्राथमिक शिक्षक शामराव जुनघरे, सचिन यादव यांचा व जिल्हा पुरस्कारप्राप्त प्राथमिक शिक्षकांचा तसेच सुभाष भांबूरे यांचा सत्कार मान्यवरांच्या शुभहस्ते करण्यात आला.

कार्यक्रमास बॅंकेचे संचालक भगवानराव धायगुडे, राजकुमार जाधव, मोहन निकम, गणेश तोडकर, दत्तात्रय कोरडे, शंकर जांभळे, चंद्रकात आखाडे, अनिल शिंदे, बंडोबा शिंदे तसेच विष्णू खताळ, गोरखनाथ साळुंखे, महेंद्र इथापे, विजय शिर्के, बी. एस. कणसे, गणेश शिंदे, रघुनाथ दळवी, बजरंग वाघ, सुरेंद्र भिलारे, राजेंद्र मुळीक, महिला अध्यक्षा स्वाती चव्हाण, मीना परामणे, संगिता कदम,सुनिता फणसे, उमेश निकम, सदाशिव कणसे, सुनिल शेडगे, तुषार घाडगे, दादा थोरात आदी शिक्षक कार्यकर्ते उपस्थित होते.

कार्यक्रमाचे सुत्रसंचालन सुरेश गायकवाड, प्रास्ताविक बॅंकेचे अध्यक्ष राजेंद्र घोरपडे व आभार बॅंकेचे उपाध्यक्ष चेअरमन महेंद्र अवघडे यांनी मानले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)