प्राथमिक शाळातील विद्यार्थ्यामध्ये इंग्रजीची गोडी

जिल्ह्यातील प्राथमिक शाळातून ‘बीसीपीटी’ व ‘आनंद’चा उपक्रम

नागठाणे – जिल्हा परिषद प्राथमिक शाळांमध्ये इंग्रजी विषयाची अध्ययनप्रक्रिया सुलभ व्हावी, मुलांमध्ये या विषयाची गोडी निर्माण व्हावी या हेतूने ‘द बॉम्बे कम्युनिस्ट पब्लिक ट्रस्ट व आनंद सामाजिक, शैक्षणिक संस्थेने पुढाकार घेतला आहे. द बॉम्बे कम्युनिस्ट पब्लिक ट्रस्टने (बीसीपीटी) सहजसोप्या पद्धतीने इंग्रजी विषयाची मांडणी केली आहे. हा विषय अधिकाधिक सहजतेने मुलांपर्यंत पोहचावा या दृष्टीने प्रयत्न केला आहे. त्यासाठी प्राथमिक शाळेतील इयत्ता पहिली ते पाचवी पर्यंतच्या वर्गांचा इंग्रजी अभ्यासक्रम डिजिटल रूपात तयार केला आहे. तो शाळांना मोफत उपलब्ध करून देण्यात आला आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

प्रोजेक्‍टरच्या माध्यमातून हा अभ्यासक्रम शाळांतून विद्यार्थ्यांना दाखविण्यात येतो. शब्द, उच्चार अन्‌ त्याला अनुरुप चित्र अशी या अभ्यासक्रमाची रचना आहे. उल्लेखनीय बाब म्हणजे हा अभ्यासक्रम मुलांचे पालक स्वतःच्या मोबाईलवरही अपलोड करु शकतात. मुलांचा घरच्या घरी अभ्यास घेऊ शकतात. या अभ्यासक्रमामुळे मुलांचे मनोरंजकही होते. त्याचबरोबर आशयाचे आकलनही सुलभ होते. जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्‍यातील गटसाधन केंद्रांतूनही हा
अभ्यासक्रम उपलब्ध करुन देण्यात आला आहे.

बीसीपीटी’च्या अभ्यासक्रमामुळे मुलांत इंग्रजी विषयाची गोडी लागत आहे. ग्रामीण भागातील मुलांत इंग्रजी विषयाबाबत मोठ्या प्रमाणात असणारी भीती कमी होण्यास मदत होत आहे. यामुळे मुलांना आत्मविश्‍वास प्राप्त होताना दिसत आहे.
सविता शिंदे,
समन्वयक

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)