प्रात्यक्षिकांद्वारे वाहतूक शिस्तीचे विद्यार्थ्यांकडून धडे

चिंबळी- वाहतुकीचे नियम न पाळल्याने अपघातात वाढ होत आहे. हेल्मेट परिधान न केल्याने तसेच सीट बेल्ट न बांधल्याने अपघातात वाहनधारक गंभीर जखमी होत आहेत. त्यामुळे वाहतूक सुरक्षेची अधिक जनजागृती व्हायलाच हवी, या हेतूने आरएसपीच्या विद्यार्थ्यांनी कुरुळीतील आदर्श चौकात प्रात्यक्षिकांद्वारे वाहतूक शिस्तीचे महत्त्व पटवून दिले. कुरुळी (ता. खेड) येथील आनंद मेडिकल फाउंडेशन संचलित आनंद इंग्लिश मीडियम स्कूलच्या वतीने सलग दुसऱ्यावर्षी आयोजित करण्यात आलेल्या महाराष्ट्र राज्य शिक्षण व पोलीस खाते अंतर्गत महाराष्ट्र राज्य वाहतूक सुरक्षा दल व नागरी संरक्षण (आरएसपी अँड सीडी) आरएसपी बाल सैनिक मेळाव्याचा समारोपाप्रसंगी विद्यार्थ्यांनी विविध प्रात्यक्षिकांचे सादरणीकरण केले. यावेळी चाकणचे सहायक पोलीस निरीक्षक डी. पी. सूर्यवंशी, एन. के. घोगरे, खेड तालुका गटशिक्षणाधिकारी संजय नायकडे आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते. या मेळाव्यात शिकवण्यात आलेल्या वाहतुकीच्या नियमांबरोबरच आतंकवादी हमला झाल्यावर कशा प्रकारे काम केले जाते, याचेही प्रात्यक्षिक सदर केले. या कार्यक्रमात आनंद मेडिकल फाउंडेशनचे संस्थापक डॉ. अनिल काळे व शाळेच्या मुख्याध्यापिका सरला सोनवणे यांनी विद्यार्थ्यांना सैन्य दलात सेवा करण्याचे आवाहन केले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)