प्राण्यांच्या शवदाहिनीमुळे नागरीक त्रस्त

पिंपरी – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या नेहरुनगर येथील प्राण्यांच्या शवदाहिनीच्या चिमणीची उंची कमी असल्यामुळे अंत्यविधीच्या वेळेस त्यातून निघणाऱ्या दुर्गंधीने स्थानिक नागरीक त्रस्त झाले आहेत. त्यामुळे चिमणीच्या धुराड्याची उंची वाढवण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.

महापालिकेच्या वतीने मृत प्राण्यांच्या विल्हेवाटीसाठी नेहरुनगर येथे विद्युत शवदाहिनीची सोय केली आहे. याठिकाणी पाळीव तसेच बेवारस श्‍वान, मांजरी आदींचे दहन केले जाते. औद्योगिक परिसर असल्याने याठिकाणी कामगार वर्ग तसेच नागरिकांचीही मोठ्या प्रमाणावर ये-जा सुरू असते. जवळच गुलाबपुष्प उद्यान देखील आहे. विद्युत दाहिनीच्या चिमणीची जास्त उंची नसल्यामुळे परिसरातील नागरिकांना दुर्गंधीला समोर जावे लागते आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

या परिसरात दहनाच्या वेळेस कोणीच थांबू शकत नाही, एवढी दुर्गंधी येथे असते, असे येथील रहिवाशांनी सांगितले.
येथे पूर्वी प्राण्यांचे दफन केले जायचे. विद्युतदाहिनी सुरु करुन पाच वर्ष झाली. परंतु, वीजे अभावी दाहिनी सुरु करण्यास विलंब झाला. दीड वर्षाच्या विलंबाने दाहिनी सुरु झाली. मात्र, विद्युत दाहिनी चालू झाल्यापासून धूर आणि दुर्गंधीची नवी समस्या सुरु झाली. याबाबत महापालिका प्रशासनाला वारंवार कळवण्यात आले. मात्र त्याची दखल कोणीच घेतली नाही. धुराड्‌याची उंची वाढवल्यास प्रश्‍न सुटतील, अशी अपेक्षा नागरीक व्यक्‍त करत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)