प्राण्यांचे मोफत रेबीज प्रतिबंधक लसीकरण

पिंपरी – रहाटणी येथील पेटस्‌ गॅलेक्‍सीच्या वतीने पाळीव प्राण्यांसाठी मोफत रेबीज प्रतिबंधक लसीकरण शिबिरात 122 प्राण्यांना लस देण्यात आल्याची माहिती आयोजक संजीव मुत्तूर यांनी दिली.

पिंपळे सौदागर येथे झालेल्या या शिबिराचे उद्‌घाटन ज्येष्ठ नगरसेवक नाना काटे यांच्या हस्ते झाले. यावेळी संजीव मुत्तूर यांनी रेबीज प्रतिबंधक लसीकरण, रोग निदान शिबीर, कुत्रा मांजर संगोपन बाबतीत मोफत मार्गदर्शन केले. ते म्हणाले की, पाळीव प्राणी हे आपले मित्र आहे. त्यांची निगा राखणे आपले कर्तव्य आहे. सामाजिक सुरक्षा यंत्रणेत श्वानची मोठी मदत होते. शिवाय दिवसभराच्या कामातून तणावमुक्त होण्यासाठी पाळीव प्राण्यांसोबत वेळ घालविला पाहिजे.

यावेळी लसीकरण केलेल्यांमध्ये 91 श्वान, 31 मांजरांचा समावेश आहे. डॉ. प्रमोद राऊत, योगेश गायकवाड, जमीर शेख, सचिन साखरे, मोहिनी वागळे, अशपाक मुल्ला, सागर दुबल, वसिम मुल्ला, स्वप्नाली पानवलकर यांनी संयोजन केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)