प्राण्यांची पाण्यासाठी वणवण थांबणार

रेडा- इंदापूर तालुक्‍यातील कडबनवाडी येथील वनक्षेत्र चिंकरा जातीच्या हरणांसाठी प्रसिद्ध आहे. सध्या उन्हाळ्याची चाहुल लागली असून वन्य प्राणी पाण्यासाठी भटकतात त्यामुळे शरयु फाउंडेशनच्या माध्यमातून नैसर्गिक पाणवठे व बंदिस्त पाणवठ्या टॅंकरद्वारे फाउंडेशनच्या अध्यक्षा शर्मिला पवार यांच्या हस्ते पाणी सोडण्यात आले.
इंदापूर तालुक्‍यातील वनवक्षेत्रात वन्य प्राण्यासाठी वनविभाग पाण्याची सुविधा योग्य रीतीने करीत नसल्यामुळे अनेक हरणे विहिरीत, शेततळ्यात पडतात, ही गंभीर बाब शरयु फाउंडेशनच्या अध्यक्षा शर्मिला पवार यांच्या निदर्शनास नागरिकांनी आणून दिली. त्यामुळे वन्यप्राण्यांची पाण्यासाठी अपघात हेवू नये यासाठी शरयु फाउंडेशनने पाठवठ्यात टॅंकरद्वारे पाणी सोडण्यचा उपक्रम हाती घेतला आहे. यावेळी शर्मिला पवार म्हणल्या की, वन विभागाने असे दुर्लक्ष करून चालणार नाही, मनुष्याला तहान लागली तर पाणी विकत घेऊन पिता येईल; परंतु वन्य प्राणी काय करणार ? असाही सवाल वनपरीक्षेत्र अधिकाऱ्यांना त्यांनी केला. व प्राण्यांबाबतीत कुठेच कुचराई करू नका यासाठी जी मदत लागेल ती देण्यासाठी शरयु फाउंडेशन पूर्ण सहकार्य करेल अशी ग्वाही त्यांनी यावेळी वन अधीक्षकांना दिली. याप्रसंगी राष्ट्रवादी महिला कॉंग्रेसच्या रहेना मुलाणी, ऍड. तेजसिंह पाटील, डी. एन. जगताप, राहुल घुले, महादेव कचरे, संजय काटे, रानजेंद्रसिंह निंबाळकर, सुभाष शिंदे, अश्‍विनी खरसे, विक्रम निंबाळकर, अजित पाटील, ऍड. सचिन राऊत, श्रीकांत करे, वनपरीक्षेत्र अधिकारी राहुल काळे,तसेच नागरीक उपस्थित होते.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)