प्राणी मित्रामुळे मिळाले दुर्मिळ प्रजातीच्या घुबडाला जीवदान

वाई, दि. 27 (प्रतिनिधी) – वाई येथील विष्णू मंदीर परिसरात जमिनीवर दुर्मिळ प्रजातीचे घुबळ निपचीत पडल्याचे दत्तात्रय तुपे यांना आढळून आले. त्यांनी त्वरित प्राणी मित्र डॉ. प्रशांत सूर्यवंशी यांना माहिती दिली. डॉ. सूर्यवंशी यांनी प्राथमिक उपचार करून ते घुबड वनक्षेत्रपाल महेश झांजुर्णे यांच्या ताब्यात दिले.
अन्न-पाण्याचे दुर्भिक्ष्य व आवास धोक्‍यात आल्याने पक्षी, प्राणी लोकवस्तीच्याजवळ येत आहेत. त्यामुळे त्यांच्या जीवितास धोका निर्माण झाला आहे, समाज कंटकाकडून त्यांची शिकार होत असते. वाईच्या विष्णू मंदिर परिसरात आलेले घुबड निपचित पडल्याचे दिसून आल्यानंतर तुपेंनी तातडीने प्राणीमित्रांशी संपर्क साधला. याकामी प्राणीमित्र अक्षय वैराट व अंकुश पवार, शाहरुख पटेल यांनी सहकार्य केले. वाई वनविभागाशी संपर्क साधून वनविभागाच्या कार्यालयात आणून पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. प्रशांत सूर्यवंशी यांनी जखमी घुबडावर उपचार सुरु केले. त्याची उडण्याची क्षमता कमी झाल्याने ते जमिनीवर बसून असल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले. चार तासांच्या अथक प्रयत्नांनी त्याच्यावर योग्य उपचार करण्यात यश आले. दोन दिवस त्याच्यावर योग्य उपचार करूनही या भागातील आधिवासात सोडण्यात येणार आहे.
पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. सुनील देशपांडे, वन्यजीवप्रेमी डॉ. प्रशांत सुर्यवंशी यांनी प्राथमिक उपचार केले. वन क्षेत्रपाल महेश झांजुर्णे, वनपाल एस. एस. राजापुरे, बी. के. कदम, रत्नाकांत शिंदे, वनरक्षक वैभव शिंदे व सुरेश सुर्यवंशी यांच्यासह वनविभागाच्या कर्मचार्यांनी उपचारादरम्यान सहकार्य केले. प्राणी मित्रांच्या सतर्कतेमुळे दुर्मिळ प्रजातीच्या घुबडाचा जीव वाचल्यामुळे नागरिकांनी समाधान व्यक्त केले.

वाई शहर भागातील होणारी वृक्षतोड ही वन्यजीवांस हानिकारक ठरत आहे. त्यांचे अधिवास नष्ट होत आहेत. नागरिकांचे अतिक्रमण वाढत चालल्याने हे जीव संख्या दिवसेंदिवस कमी होत चालले आहेत.

– प्रशांत सूर्यवंशी, (सह्याद्री प्रोटेक्‍टर्स)


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)