प्राणी दत्तक योजनेला “घरघर’

आठ वर्षांत फक्‍त 313 जणांनी घेतले प्राणी दत्तक

पुणे – महापालिकेने सुरू केलेल्या प्राणी दत्तक योजनेला अल्पावधीतच घरघर लागली आहे. या योजनेसाठी गेल्या आठ वर्षांत अवघ्या 313 जणांनी प्रतिसाद दिला असून त्यातून संग्रहालय व्यवस्थापनास 36 लाख 34 हजार रुपयांचा महसूल मिळाला आहे.

महापालिकेच्या कात्रज येथील राजीव गांधी प्राणी संग्रहालय व वन्यजीव संशोधन केंद्रात असलेल्या प्राण्यांबाबत जनजागृती व्हावी, तसेच या संग्रहालयासाठी येणारा खर्च मोठ्या प्रमाणात असल्याने नागरिकांनीही या प्राण्यांना दत्तक घेऊन खर्चाला हातभार लावावा.

वन्य जीवांबाबत जनजागृती व्हावी, यासाठी महापालिकेने ऑक्‍टोबर-2010 मध्ये ही प्राणी दत्तक योजना सुरू केली होती. त्या अंतर्गत संग्रहालयातील प्राण्यांचे नागरिकांनी एका दिवस ते एका वर्षापर्यंत पालकत्त्व घेऊन त्यांच्यासाठी लागणाऱ्या आहाराचा खर्च द्यावा, अशी ही योजना आहे. त्यात एक दिवस, एक महिना, तीन महिने आणि एका वर्षांसाठी पालकत्त्व घेता येते. त्यात प्रामुख्याने हत्ती, वाघ, लांडगा, मगर, साप, माकड असे जवळपास 23 प्रजातींचे प्राणी दत्तक घेता येतात. त्यानुसार, या प्राण्यांसाठी लागणाऱ्या अन्नाची रक्कम व्यवस्थापनाने निश्‍चित केली आहे. त्यानुसार, नागरिक निश्‍चित केलेली रक्कम भरून प्राणी दत्तक घेऊ शकतात. वैयक्तिकरित्या तसेच कंपनी अथवा समूहालाही या योजनेअंतर्गत प्राणी दत्तक घेता येतात. महापालिकेने या योजने बाबत प्राणी संग्रहालयात आलेल्यांत मोठ्या प्रमाणात जनजागृतीही केली आहे. मात्र, त्यानंतरही प्रतिसाद मिळत नसल्याचे चित्र आहे.

हत्ती वाघ, माकड आणि सापांना प्राधान्य
प्राणी संग्रहालय व्यवस्थापनाने दिलेल्या माहितीनुसार, नागरिकांकडून वाघ, सिंह आणि हत्तीलाच दत्तक घेण्यासाठी प्राधान्य दिले जात आहे. त्यातही या प्राण्यांचा खर्च जास्त असल्याने एक दिवसासाठीच हे प्राणी दत्तक घेतले जात आहे. तर, खर्च कमी असल्याने साप दत्तक घेण्यासही प्राधान्य आहे. प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, आतापर्यंत केवळ 2015-16 मध्ये 73 वेळा प्राणी दत्तक घेण्यात आले होते. तर सर्वांत कमी 2012-13 मध्ये 16 वेळा आणि या वर्षात 17 वेळा प्राणी दत्तक घेण्यात आले आहेत.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)