“प्राणी क्‍लेष प्रतिबंधक’वर शहरातील दोघांची वर्णी

पिंपरी – राज्य सरकारच्या आदेशानुसार स्थापन करण्यात आलेल्या जिल्हास्तरिय प्राणी क्‍लेष प्रतिबंधक समितीची स्थापना करण्यात आली आहे. पुणे जिल्ह्याकरिता स्थापन केलेल्या या समितीवर शहरातील दोघांची तर देहूगावातील एकाची अशासकीय सदस्यपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

केंद्र शासनाच्या प्राणी क्‍लेष प्रतिबंधक अधिनियम, 1960 मधील तरतुदींची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यासाठी राज्यातील प्रत्येक जिल्ह्यामध्ये प्राणी क्‍लेष प्रतिबंधक व्यवस्थापकीय समितीची स्थापना करण्याचे निर्देश राज्य सरकारच्या पशूसंवर्धन विभागाने दिले आहेत. त्यानुसार राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये या आदेशाची अंमलबजावणी करण्यात आली आहे. गोशाळा, पांजरपोळ संस्थेचे अध्यक्ष, प्राणीविषयक काम करणाऱ्या सेवाभावी संस्थांचे प्रतिनिधी, व्यक्‍ती आणि मानवहित तसेच प्राण्यांवर प्रेम करणाऱ्या व्यक्‍तिींची या समितीवर नियुक्ती करण्याचे पशूसंवर्धन विभागाच्या विचाराधीन होते.

दरम्यान, जिल्हाधिकारी कार्यालयाकडून प्राप्त झालेला प्रस्ताव विचारात घेवून, दि. 14 मार्च 2017 च्या अधिसुचनेतील खंड (क) 3 येथील तरतुदीनुसार, पुणे जिल्ह्यातील प्राणी क्‍लेष प्रतिबंधक व्यवस्थापकीय समितीवर अशासकीय सदस्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. यामध्ये भोसरी येथील पांजरपोळ संस्थेचे पदाधिकारी शंभू पवार आणि पिंपरीतील सामाजिक कार्यकर्त्या रूपाली देवरे यांचा समावेश करण्यात आला आहे. याशिवाय देहू, झेंडेमळा येथील सुरेश रास्ते यांचा देखील समावेश करण्यात आला आहे.

हे आहेत समिती सदस्य...
शंभू पवार (भोसरी, पांजरपोळ), रुपाली देवरे (पिंपरीगाव), नेहा पंचमिया (रेंजहिल्स, पुणे), उषाकांत गौर (भवानी पेठ, पुणे), मोहन मते (कर्वेनगर), सुरेश रास्ते (झेंडेमळा, देहूगाव), सचिन मोकाटे (कोथरूड), संदीप नवले (परिंचे, ता. पुरंदर), गणेश मोरे (कळस, पुणे), हरिश खोमणे (दौंड), बापूसाहेब कोकरे (बारामती)


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)