प्राणायाम

प्राण म्हणजे वैश्‍विक जीवन शक्ती होय, तर आयाम म्हणजे तिला नियंत्रित करणे, दीर्घ करणे. आपल्या शारीरिक आणि सूक्ष्म स्तरांसाठी प्राणशक्तीचे खूप महत्त्व आहे, जिच्या शिवाय आपले शरीर नष्ट पावू शकते, जिच्यामुळे आपण जिवंत आहोत. श्‍वसनाच्या माध्यमातून प्राणावर नियंत्रण प्राप्त करणे म्हणजे प्राणायाम. या प्रक्रिया नासिकांद्वारे श्‍वास घेण्यावर अवलंबून आहेत.

भस्त्रिका, कपालभाती आणि नाडी शोधन प्राणायाम हे काही साधारण प्राणायाम आहेत. यांच्या सततच्या सरावामुळे प्राणशक्तीचे प्रमाण आणि गुणवत्ता यांची वृद्धी, नाडी आणि चक्रे यामधील अडथळे निघून जाणे तसेच या सर्वामुळे सरावकर्त्यास जोमदार, उत्साही आणि सकारात्मक वाटते. प्राणायाममुळे शरीर, मन आणि आत्मा यामध्ये संतुलन प्राप्त होऊन शारीरिक, मानसिक आणि आत्मिक बळकटी प्राप्त होते.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

प्रथम सावकाश डाव्या नाकपुडीने एकदाच श्‍वास घ्यावा मग तो सावकाश दोन आकड्यात उजव्या नाकपुडीने सोडावा.उजव्या नाकपुडीने श्‍वास सोडताना तो किंचित्‌ रोखावा. शक्‍यतो मनात चार आकडे मोजून तो रोखावा व सावकाश दोन आकडयात श्‍वास सोडावा. लगेचच एक आकड्यात उजव्या नाकपूडीने श्‍वास घेऊन परत मनात चार आकडे मोजून कुंभक करून डावीने तो दोन आकड्यात सावकाश सोडावा. 1ः4ः2 असे प्रमाण ठेवून काही दिवस नाडीशुद्धी प्राणायाम करावा.

मग 2ः8ः4 असे प्रमाण करावे. हळूहळू योग्य योगतज्ञांच्या मार्गदर्शनाने हा कालावधी वाढवावा.अशाप्रकारे तुम्ही 4ः16ः8 असे आदर्श प्रमाण गाठू शकाल. फक्‍त त्यासाठी रोज चार आवर्तने जरूर करावीत. सुरूवातीला तेवढ्या आकड्यात पूरक, रेचक आणि कुंभक होत नाही. आधीच श्‍वास सोडला जातो. पण आपण अजिबात घाबरून जाऊ नये. यासाठी तर योगशिक्षक हवा. योग शिक्षक टाळी किंवा स्टॉप वॉचने तुमचे टायमिंग व तुमचा नाडीशुद्धी प्राणायाम शास्त्रशुद्ध तपासतो. आपल्या शरीरात रक्‍तवाहिन्या व नलिकांना नाडी अशी संज्ञा वापरतात. या नाडीचा अंर्तभाग म्हणजे शिर मध्य भाग म्हणजे धमनी असते. या शिरा आणि धमनींचे शुद्धीकरण म्हणजेच नाडीशुद्धी प्राणायाम होय. याने फुफ्फुसाचे अनेक रोग दूर होतात.

– धनश्री जाधव


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)