प्राणप्रिय पर्स…

कुठल्याही नव्या फॅशनची सुरुवात सेलिब्रिटींपासून होते. टोट बॅग्जच्या बाबतीतही तेच दिसून येतं. सेलिब्रिटींपासून सामान्य महिलांपर्यंत या बॅग्ज केवळ फॅशन म्हणूनच नाही तर सोयीस्कर, उपयुक्त म्हणूनही लोकप्रिय बनल्या आहेत.

पर्स आणि बॅग्ज ही महिलांसाठी अत्यावश्‍यक बाब आहे. नोकरदार महिला असोत किंवा गृहिणी, प्रत्येकीला याची आवश्‍यकता असतेच. आकर्षक, महागड्या, रंगीबेरंगी पर्सच्या फॅशनसोबत आता टोट बॅग्जचीही चांगलीच चलती दिसून येत आहे. कुठल्याही नव्या फॅशनची सुरुवात सेलिब्रिटींपासून होते. टोट बॅग्जच्या बाबतीतही तेच दिसून येतं. सेलिब्रिटींपासून सामान्य महिलांपर्यंत या बॅग्ज केवळ फॅशन म्हणूनच नाही तर सोयीस्कर, उपयुक्त म्हणूनही लोकप्रिय बनल्या आहेत. या ओपन असून दोन्ही बाजूने हॅण्डलूमचे स्ट्रिप्स लावलेले असतात.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

“टोट’ या शब्दाचा साधा सरळ अर्थ “टू कॅरी’. सुरुवातीला या बॅग्जचा आकार मोठा होता. नंतर थोडा छोटा बनला आणि तोच आकार लोकप्रिय ठरला. या बॅग्ज कापड किंवा लेदर दोन्हीपासून बनवल्या जातात. यामध्ये बरंच सामान सहजपणे कॅरी करता येतं. टोट प्रकारच्या बॅग्ज मोठया ब्रॅंडेड कंपन्या, डिझायनर्स यांनी अधिक विविधतेत उपलब्ध करून दिल्या आहेत. तसंच इको फ्रेंडली आणि खिशाला परवडतील अशा रेंजमध्येही त्या उपलब्ध आहेत. कापड आणि ज्यूटपासून बनवलेल्या टोट बॅग्जना अधिक मागणी आहे. लेस, बीड्‌स, रेशीमवर्क, पेंटिंग यांद्वारे या बॅग्ज अधिक सजवल्या जात आहेत. त्यामुळे त्या अधिक आकर्षक बनत आहेत.

टोट बॅग्जचं वैशिष्ट्य म्हणजे या बॅग्ज साडी, जीन्स, सलवारसूट अशा कोणत्याही आउटफिटवर कॅरी करता येतात. मात्र, बॅगची निवड करताना त्यातील व्हरायटीनुसार कपड्यांचा विचार करावा. साडीवर प्रिंटेड टोट बॅग चांगली दिसते तर जीन्सवर बीड्‌स असणारी, स्कर्ट किंवा सलवार सूटवर लेदरची टोट बॅग उत्तम पर्याय ठरते. सर्व प्रकारच्या कपड्यांवर ही बॅग सुरेख दिसत असल्याने उच्चपदावर काम करणाऱ्या महिलांसोबतच व्यावसायिक महिलाही या बॅगला पसंती देत आहेत आणि त्या छानच दिसतात. तसंच आपल्या व्यक्तिमत्त्वात यामुळे फॅन्सीपणा सोबर आणि ग्रेसफूल लूक येतो.

सुरुवातीला टोट बॅग एकदम साध्या म्हणजे, एकाच कप्प्याच्या, चेन नसलेल्या होत्या. मात्र आता मागणीनुसार यामध्ये अनेक पर्यायही असतात. यामुळे यामध्ये अधिक सुरक्षितपणे सामान ठेवता येतं. सिंपल टोट बॅग्ज बऱ्याच कंपन्या आपल्या उत्पादनाच्या प्रसारासाठी वापरतात. या बॅग्ज कापड, रेग्झीन किंवा जाड पेपरपासून बनवलेल्या असतात. कंपनीच्या वस्तू खरेदी केल्यानंतर ही बॅग मिळते. ती नंतर आपण बरेच दिवस वापरू शकतो.

लेदरपासून बनलेल्या टोट बॅग्ज पार्टीला जाताना साडी किंवा वेस्टर्न वेअरवर चांगल्या दिसतात. स्टायलिश पद्धतीने बॅग्ज हातात धरल्यास व्यक्तिमत्त्वात लगेच फरक पडतो. या बॅग्ज 200 रुपयांपासून हजारो रुपयांपर्यंतही मिळतात. बॅंड्रेड बॅग्ज हव्या असतील तर थोडे जास्त पैसे मोजावे लागतील. मात्र, सिंगल टोट बॅगही स्टायलिश लुक देणारच.

एखाद्या समारंभाला जायचं म्हटलं की स्त्रियांची आधी लगबग असते ती साडी, दागिने, मेकअप हे सगळं अगदी परफेक्‍ट मॅचिंग करण्याची! इतकंच काय कपाळावरची टिकलीही सेम टू सेम रंगाचीच हवी, हा आग्रहही अगदी घरातून बाहेर पडेपर्यंत कायम असतो. पण आपलं एकूणच व्यक्तिमत्त्व खुलून उठेल इतका हा सगळा साजशृंगार नीटनेटका, मॅचिंग असेल आणि बाहेर पडताना हातात घेत असलेली बॅग, पर्स मात्र याउलट अगदीच साधी, तीही डल असेल तर एकूणच नटण्या-सजण्याची सगळी रयाच निघून जाईल. खरं तर नटे-सजेपर्यंत आपली ही पर्स आपल्या व्यक्तिमत्त्वात इतका फरक पाडणारी असेल, हे आपल्या साधं लक्षातही येत नाही. पण पूर्ण तयार होऊन हातात पर्स घेऊन आपण आरशात स्वत:ला पाहतो, तेव्हा कळतं की, अरे, पर्सचं गणित जुळवायचं मात्र राहिलंच. असं अनेकदा तुमचं-माझं, आपल्या प्रत्येकीचंच झालं असेल.

तेव्हा तुम्हाला हेही पटलं असेलच ना की, जितकं महत्त्व आपल्या एकूणच व्यक्तिमत्त्वात आपल्या कपड्यांना, मेकअपला आहे, तितकंच ते आपल्या हाताशी असलेल्या पर्स-बॅगलाही! तुमचे कपडे, मेकअप, मॅचिंग टिकली या सर्वाबरोबर जर तुमची बॅग तुम्ही घातलेल्या कपड्यांना साजेशी आणि आकर्षक असेल तर कोणत्याही समारंभात तुम्ही गेलात तरी चारचौघांत सौंदर्याचं एकूण समीकरण तुम्ही जुळवलं आहे, हे दर्शनीच सगळ्यांच्या नजरेत भरेल, हे मात्र नक्की.

सध्या वैविध्यपूर्ण सुविधांनी युक्त क्‍लच पॅटर्न पाहायला मिळत आहेत. क्‍लच हॅंडबॅग्जमध्ये स्त्रियांना आवश्‍यक असणाऱ्या सुविधा, चांगला दर्जा आणि आकर्षक डिझाइन्स उपलब्ध आहेत. या प्रकारे विविध आकारांमध्ये क्‍लच पर्स उपलब्ध आहेत. कॉम्पॅक्‍ट पर्स’ तसंच हॅंडबॅग म्हणून त्या वापरता येतात. सुंदर दिसण्यासाठी विविध प्रकारचे पोशाख केले जातात. त्यावर शोभून दिसतील अशा वेगवेगळ्या बॅग्ज वापरण्याऐवजी विविध पोशाखांवर शोभून दिसेल अशी एकच क्‍लच बॅग कामी येऊ शकते. कॉलेजमधल्या तरुणींपासून नोकरदार महिला आणि गृहिणींच्या पेहरावात शोभा आणण्यासाठी क्‍लच पर्स हा नामी पर्याय ठरतो.

यात वेगवेगळे रंग उपलब्ध आहेत. काळा, चॉकलेटी, पांढरा, मरून हे ऑल टाइम फेवरेट’ रंग तर मिळतातच. पण सिल्वर, हॉट रेड, पर्शियन ब्ल्यू, फ्रेश ग्रीन अशा रंगांच्या क्‍लचेसनासुद्धा तरुणी पसंती देत आहेत. फक्त रंगच नाहीत तर वेगवेगळ्या मटेरियलमध्ये ही क्‍लचेस, बॅग्ज पाहायला मिळतात. कॉटनपासून लेदरपर्यंत सगळ्या मटेरियल्सचा वापर केला जातो. शिवाय एकाच रंगात किंवा संपूर्णत: प्रिंटेड, खडे, लेस, आरसे यांचा वापर करून सजवलेल्या बॅग्ज आणि क्‍लचेस पाहायला मिळतात.

“टायगर प्रिंट’ सध्या विशेष चलतीत आहे. अगदी रस्त्यावरच्या विक्रेत्यापासून ते मॉलमधल्या चकचकीत बॅग शोरूमपर्यंत सगळीकडे ही “टायगर प्रिंट’ असतेच. पार्टी वेअरवर अशी टायगर प्रिंटची किंवा सॅटिनची बॅग घेतल्यास आपला लूक अगदी ग्लॅमरस दिसतो. पारंपरिक पंजाबी ड्रेस किंवा साडीवर इरकली, पैठणी किंवा इतर प्रकारचं कापड वापरून केलेलं क्‍लच शोभून दिसतं. जीन्स, सलवार-कुर्ता, साडी किंवा अन्य कोणत्याही पेहरावावर क्‍लच पर्स किंवा हॅंडबॅग वापरता येते.

– श्रुती कुलकर्णी


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)