प्राणघातक हेड इंज्युअरी (भाग एक)

निरनिराळ्या प्रकारच्या अपघातांमध्ये “हेड इंज्युरी’ अर्थात डोक्‍याला मार लागून रुग्णाच्या जीवावर बेतण्याच्या प्रमाणात विलक्षण वाढ होत आहे. अशा अपघातांमध्ये समाजात म्हणावी तितकी जागृती नाही. या अपघातांमध्ये रुग्णाला हॉस्पिटलमध्ये आणताना सामान्य माणसांकडून नीट हाताळलं जातं नाही. हेड इंज्युरी’च्या अपघातांचं प्रमाण कमी व्हावं, तसंच अपघातानंतर रुग्णाला वेळीच हॉस्पिटलमध्ये भरती केलं तर अपघाती मृत्यूंची संख्या कमी होईल.

महाराष्ट्रात वाहन अपघातांची संख्या वाढत आहे. खासकरून दुचाकीवरून होणाऱ्या अपघातात डोक्‍याला मार लागून दगावण्याच्या प्रमाणात कमालीची वाढ होत आहे. वाहतूक शिस्तीचा अभाव, अप्रशिक्षित वाहनचालक, चालकाने बेदरकारपणे वाहन चालवणं, शीरस्त्राण (हेल्मेट) न वापरणं, ही दुचाकीवरून होणाऱ्या वाहन अपघातांची प्रमुख कारणं आहेत.

फक्त वाहन अपघातातच मेंदूला जबरदस्त इजा पोहोचत नाही. तर खेळताना डोक्‍याला मार लागून पडल्यामुळे, वरून खाली पडल्यामुळे, टेनिस नाही तर सिझन बॉलचा आघात बसल्यामुळे, भांडणामध्ये एखाद्या जड वस्तूचा आघात डोक्‍यावर बसल्यामुळे, घसरून पडून डोक्‍याला मार लागल्यामुळेही डोक्‍याला जबरदस्त मार बसून मेंदूला इजा होते. हेड इंज्युरीचे फारच थोडे रुग्ण असे असतात की, ज्यांना कुठल्याही प्रकारचं अपंगत्त्व येत नाही.

पण बहुतेकदा हेड इंज्युरी जीवावर बेतते. आयुष्य अपंग करून टाकते. नाक, कान, डोळे या अवयवांचं कार्य मंदावतं. म्हणजे गंधाची (वास) समज कमी होते. कानांनी ऐकू कमी येतं किंवा कायमचं बहिरेपण येतं. डोळ्यांनी एका ठराविक मर्यादेपलीकडे बघणं अशक्‍य होऊन जातं. हेड इंज्युरीचा परिणाम स्मरणशक्तीवर, आठवणींवर (स्मृती) होतो. स्मरणशक्ती कमी होते. काही मर्यादेपलीकडे आठवत नाही. एक ठराविक काळच लक्षात राहतो. कधी कधी आठवतच नाही. अवयव निकामी होतात. अर्धागवायूचा (पॅरालिसीस) झटका येतो. काही काळानंतर थोड्या प्रमाणात रुग्णात सुधारणाही होते, पण काही रुग्णांत तीळभरही सुधारणा होत नाही.

डोक्‍याला मार लागून झालेल्या अपघाताचा परिणाम इतका गंभीर का असतो? त्याचं एक आणि एकमेव कारण आहे मेंदू. वैद्यकशास्त्राच्या दृष्टीने आपला मेंदू चार भागात विभागलेला आहे. मोठा मेंदू, लहान मेंदू, लंबमज्जा आणि मज्जारज्जू. तर मानसशास्त्राने मेंदूचे तीन भाग धरले आहेत. मूळ मेंदू, मध्य मेंदू आणि मुख्य मेंदू. मेंदूचा सर्वात खालचा मेंदू हा मूळ मेंदू’ (ब्रेनस्टेम) म्हणून ओळखला जातो. तो चेतारज्जूशी जोडलेला भाग असतो. मेंदूचा मधला थर मध्य मेंदू’ (मिडब्रेन) म्हणून ओळखला जातो. तर मेंदूचा वरचा थर मुख्य मेंदू'(सेरेब्रम)असतो.

मूळ मेंदू अगदी मुलभूत शारीरिक कामांचं म्हणजे श्‍वसन, रक्ताभिसरण, जाणीव (स्पर्श) इत्यादी दैनंदिन जीवनातील प्राथमिक कामांचं नियंत्रण करतो. मूळ मेंदूला इजा झाल्यास बेशुद्धी, श्‍वसन आणि हृदयाची क्रिया थांबते. कधी कधी मृत्यूही येतो. मध्य मेंदू हा भावना, वासना, लैंगिक इच्छाया भावभावनांचं नियंत्रण करतो.

डॉ. संजय क्षीरसागर


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)