प्राज इंडस्ट्रीजच्या एमडी पदी शिशिर जोशीपुरा

पुणे-प्राज इंडस्ट्रीज्‌ या जागतिक प्रक्रिया सोल्युशन्स कंपनीने शिशिर जोशीपुरा यांची मुख्य व्यवस्थापकीय संचालक (एमडी) पदी नियुक्‍ती केली आहे. 2 एप्रिल 2018 पासून त्यांनी कार्यभार स्वीकारला आहे. जोशीपुरा यांनी बिर्ला इन्स्टिट्यूट ऑफ टेक्‍नोलॉजी (बीआयटीएस) पिलानीमधून मेकॅनिकल इंजिनिअरिंग आणि हार्वर्ड बिझनेस स्कूलमधून ऍडव्हान्स मॅनेजमेंटची पदवी मिळवली आहे.

प्राजमध्ये रुजू होण्यापूर्वी त्यांनी 2009 पासून एसकेएफ इंडियामध्ये व्यवस्थापकीय संचालक आणि राष्ट्रीय व्यवस्थापक म्हणून काम पाहिले आहे. प्राज इंडस्ट्रीजचे कार्यकारी अध्यक्ष प्रमोद चौधरी म्हणाले, प्राजचे नवे सीईओ आणि व्यवस्थापकीय संचालक शिशिर यांचे मी मंडळातर्फे स्वागत करतो. विविध स्तरावर नेतृत्व करीत त्यांच्या 35 वर्षांहून अधिक अनुभवासह ते आमच्या कंपनीत रुजू होत आहेत. उद्योग क्षेत्रातील विविध कल्पनांच्या पार्श्‍वभूमीसह स्थानिक आणि जागतिक बाजारपेठेतील त्यांचा अभ्यास वृद्धीच्या पुढील टप्प्यात प्राजसाठी निश्‍चितच मार्गदर्शक ठरेल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)