प्राज्ञपाठशाळेचा आदर्श इतरांनी घ्यावा : डॉ. अनिल काकोडकर

वाई – संस्थांच्या जडणघडणीत प्राज्ञपाठशाळा मंडळाचा अनुभव समाजाने ध्यानात घ्यावा आणि या संस्थेचा आदर्श स्वतः समोर ठेवून आपली वाटचाल करावी, असे उद्‌गार प्रख्यात अणुशास्त्रज्ञ डॉ. अनिल काकोडकर यांनी काढले. प्राज्ञपाठशाळा मंडळाच्या पुस्तक प्रकाशन समारंभात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी डॉ. सरोजा भाटे होत्या.

डॉ. काकोडकर म्हणाले, वाईसारख्या छोट्या गावात पूर्ण शतकभर प्राज्ञपाठशाळामंडळ अखंडितपणे कार्यरत आहे ही बाब अत्यंत आश्‍चर्यकारक वाटते. ही सर्व कामे शिक्षणाशी निगडीत आहेत. परंतु, अलिकडे शिक्षणामध्ये आवश्‍यक असणारे संशोधन दुर्लक्षित झाले आहे. आणि त्याचा परिणाम म्हणजे शिक्षणाचा अपेक्षित दर्जा सुधारलेला नाही, असे अनुभवास येते. शिक्षणसंस्थांमध्ये संशोधन हे अधिक मोलाचे आहे.

डॉ. सरोजा भाटे यांनी यावेळी मनोगत व्यक्‍त केले. यावेळी प्राज्ञप्रबोध, संस्कृती ऑजिम्पियाड व धर्मप्रसार या पुस्तकांचे प्रकाशन डॉ. काकोडकर यांनी केले. पुस्तकांचा परिचय संस्थेचे विश्‍वस्त डॉ. श्री. मा. भावे यांनी करून दिला. अनिल जोशी यांनी परिचय तर प्रणव गोखले यांनी सूत्रसंचालन केले. संचालक प्रा. स. रा. फडणीस यांनी आभार मानले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)