प्राचार्य बामणे यांचा सेवानिवृत्तीनिमित्त सत्कार

औंध, दि. 30 (वार्ताहर) – माझ्या शैक्षणिक आयुष्यात शिक्षकांकडून मला इंग्लिश विषय घेऊ नये यासाठी दबाव आणला जायचा, मात्र मी हा दबाव न जुमानता इंग्लिश विषय घेऊनच फॉर्म भरायचो. त्यामुळे माझ्याबरोबर असणारे 60 विद्यार्थी नापास झाले होते. परंतु, उराशी ध्येय बाळगल्यामुळे आणि अथक प्रयत्नांमुळेच मला यश मिळाले, तुम्ही सर्व विद्यार्थ्यांनीही अशाच प्रकारे जिद्दीने अभ्यास करुन यश मिळावावे, असे प्रतिपादन प्राचार्य संभाजीराव बामणे यांनी केले. सेवानिवृत्तीनिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.
प्राचार्य संभाजीराव बामणे हे राजा श्रीपतराव भगवंतराव महाविद्यालयामध्ये प्राचार्य म्हणून कार्यरत होते. नुकतेच ते सेवेतून निवृत्त झाले. त्यानिमित्त महाविद्यालयाच्यावतीने त्यांना सेवानिवृत्ती सत्कार करण्यात आला. यावेळी प्रास्ताविकात प्रा. भंडारे म्हणाले, बामणे सरांनी जी. पी. कोर्स, वायसीएम विद्यापीठाचे कोर्स सुरु केले. तसेच विद्यालयाचे खेळाडू राष्ट्रीय स्तरावर खेळवले. तसेच राष्ट्रीय चर्चासत्र, मायनर प्रोजेक्‍ट, शॉर्ट कोर्स, एनएसएससारख्या कार्यक्रमातून शिबिरे, पाणी फाऊंडेशन गावांना भेटी, ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना रोजगार उपलब्ध करणे यांसारखे अनेक उपक्रम सुरु केले.
कार्यक्रमास हनमंतराव शिंदे, दीपक करपे, हनुमंतराव खैरमोडे, विनोद थोरात, संपूर्ण प्राध्यापक वर्ग माजी विद्यार्थी उपस्थित होते. प्राध्यापक एस. आर. भोसले यांनी आभा मानले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)