“प्रहार जनशक्ती’च्या वतीने महावितरण कार्यालयात सुतळी बॉम्ब फोड आंदोलन

नगर: जायकवाडी वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने महावितरण कार्यालय येथे सुतळी बॉम्ब आंदोलन यावेळी मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते.

जायकवाडी वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने महावितरण कार्यालय येथे सुतळी बॉम्ब फोड आंदोलन सकाळी अकरा वाजता करण्यात आले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

जायकवाडी जलाशय परिसर नेवासा शेवगाव तालुक्‍यातील वीज भारनियमन त्वरित रद्द करण्यात यावे चार तासाची वीज पुन्हा बारा तास करण्यात यावी,दुष्काळी परिस्थिती व शेतमाल हमीभाव नसल्याने सर्व शेतकरी बांधवांची वीज बील माफ करण्यात यावी,शेतकरी बांधवांच्या शेती वीज पंपाचे जर भारनियमन करणार असाल तर औरंगाबाद एम आय डी सी ला वीज भारनियमन व पाणी कपात करण्यात यावे ,जायकवाडी धरणाची निर्मिती पिण्याचे पाणी व शेतीसाठी झाली आहे,आधी न्याय शेतकरी बांधवांना देण्यात यावे,तसेच अहमदनगर जिल्ह्यातील जिल्हा परिषद शाळेच्या आवारातील धोकादायक वीज खांब त्वरित हालवण्यात यावे वरील मागण्या मान्य नाही झाल्या तर आंदोलन अधिक त्वरित करण्यात येईल असे प्रहार जनशक्ती पक्षाचे उत्तर जिल्हा अध्यक्ष अभिजित पोटे यांनी सांगितले आहे.

आंदोलन नतंर कार्यकारी अभियंता जीवन चव्हाण यांनी सविस्तर चर्चा शेतकऱ्यांच्या सोबत केली व लवकरात लवकर हा प्रश्‍न मार्गी लावण्यासाठी प्रयत्न केले जाईल असे चव्हाण यांनी सांगितले. यावेळी धरणग्रस्त अध्यक्ष कृष्णा सातपुते,प्रहार शेतकरी राज्यउपाध्यक्ष संतोष पवार,जिल्हा संघटक बाळासाहेब खर्जुले,नेवासा तालुका अध्यक्ष चंद्रकांत नवथर,तालुका कार्य अध्यक्ष गणेश चौघुले,दिंगबर जामदार,जयवंत मोटे,श्रीरामपूर तालुका अध्यक्ष रघुनाथ शिंदे ,बाळासाहेब कोकणे,विलास डौले,सचिन गायकवाड आदी यावेळी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)