प्रसिद्ध सतार आणि सूरबहारवादक इमरत खान यांचे हृदयविकाराने निधन 

नवी दिल्ली – प्रसिद्ध सतार आणि सूरबहार वादक इमरत खान (86) यांचे गुरुवारी अमेरिकेत हृदयविकाराने निधन झाले. इमरत खान यांचे पुत्र, सतारवादक निशत खान यांनी शुक्रवारी ही माहिती दिली. महान सतारवादक उस्ताद विलायत खान यांचे इमरत खान हे कनिष्ठ बंधू होत, इमरत खान स्वत: एक श्रेष्ठ सतारवादक आणि आपल्या जमान्यातील एक महान सूरबहार वादक होते. गेल्या वर्षी त्यांनी पद्मश्री पुरस्कार नाकारला होता.

पुरस्कार देण्यास फार उशीर झाल्याचे आणि आता त्याने आपल्या कार्याची महती कमी होणार असल्याचे त्यांनी म्हटले होते. त्यांच्या दृष्टीने पद्मश्री नाकारणे हा मोठेपणाचा मुद्दा नव्हता, तर औचित्याचा मुद्दा होता. त्यांच्या साथीदारांना आणि शिष्यांनाही अगोदरच पद्‌म पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले होते.

-Ads-

सुमारे 400 वर्षांची परंपरा असलेल्या इटावा या घराण्याचे ते कलाकार होते. इमरत खान यांच्या आजोबांच्या नावावरून इटावा घराण्याला इमदाद घराणे म्हणून ओळखले जाते. इमदाद घराण्याने सतारीमध्ये बदल करून सूरबहार या वाद्याची निर्मिती केली. सूरबहारला बास सतार असेही म्हटले जाते. इमरत खान हे माझे वडीलच नव्हते, तर ते माझे गुरू, सल्लागार आणि शिक्षक होते.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)