प्रसिद्ध संवाद लेखक सलीम खान यांना “इफ्फी’चा विशेष पुरस्कार 

पणजी – गोव्यात सुरु असलेल्या 49 व्या इफ्फीच्या सांगता समारंभात प्रसिद्ध पटकथा लेखक सलीम खान यांना इफ्फी विशेष पुरस्काराने गौरवण्यात येणार आहे. चित्रपट क्षेत्रातल्या अमूल्य योगदानाबद्दल त्यांचा सन्मान करण्यात येणार असून 10 लाख रुपये, प्रशस्तीपत्रक आणि शाल या पुरस्काराने त्यांना गौरवण्यात येणार आहे.

केंद्रीय माहिती आणि प्रसारण राज्यमंत्री (स्वतंत्र कार्यभार) राज्यवर्धन राठोड यांनी आज ट्विटरवरुन ही माहिती दिली आहे.
24 नोव्हेंबर 1935 मध्ये इंदूर येथे सलीम खान यांचा जन्म झाला. अमाप लोकप्रिय झालेला “शोले’ हा चित्रपट, “दिवार’, “जंजीर’ यासारख्या लोकप्रिय चित्रपटांच्या त्यांनी लिहिलेल्या पटकथा रसिकांच्या पसंतीला उतरल्या. अभिनेता आणि निर्माते म्हणूनही त्यांचे योगदान राहिले आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)