मुंबई – बॉलिवुडमधील प्रसिद्ध डान्सर अभिजित शिंदे याने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. आत्महत्येच्या आधी अभिजित शिंदेने एक चिठ्ठी लिहिली आहे. या चिठ्ठीत बॅंकेचे अकाऊंट मुलीच्या नावे केले असल्याचे त्यात म्हटले आहे. या प्रकरणाची माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी दाखल झाले असून त्यांनी अभिजितचा मृतदेह ताब्यात घेतला आहे.

अभिजित शिंदेने आत्तापर्यंत सलमान खान, तुषार कपूर, रणबीर कपूर, रणवीर सिंह यासह अनेक दिग्गजांसोबत काम केले आहे. घरातील पंख्याला गळफास घेऊन त्याने आत्महत्या केली. त्याच्या घराचा दरवाजा उघडाच होता. त्यामुळे ही घटना शेजाऱ्यांना समजली. जेव्हा अभिजितला पंख्याला लटकलेल्या अवस्थेत शेजाऱ्यांनी पाहिले तेव्हा त्याला रूग्णालयात नेण्यात आले. मात्र तिथे डॉक्‍टरांनी त्याला मृत घोषित केले.

अभिजित शिंदेची पत्नी त्याला सोडून गेली होती त्यामुळे तो नैराश्‍यात होता. अभिजितला तीन महिन्यांची मुलगी आहे. अभिजितच्या पत्नीने मुलीला भेटण्यास मनाई केली होती. त्यामुळे तो आणखी निराश झाला होता. तसेच हाती काही काम मिळत नसल्याने तो तणावात होता. या प्रकरणी अभिजितच्या पत्नीचीही चौकशी केली जाणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)