प्रसिद्धीसाठी राहुल गांधी राफेल कराराबाबत खोट्या बाबी शोधून काढत आहेत – प्रकाश जावडेकर

नवी दिल्ली: आलोक वर्मांनी राफेल करारातील घोटाळ्याला विरोध केला म्हणून त्यांना सरकारने सक्तीच्या सुट्टीवर पाठवले असल्याचा आरोप काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी केला होता. दरम्यान भाजपने राहुल गांधींवर पलटवार केला आहे.

कॉंग्रेस पक्ष्याच्या स्वतःचे महत्व अधोरेखित करण्याच्या सर्व आशा संपुष्टात आल्या आहेत. तसेच प्रसिद्धीसाठी राहुल गांधी दररोज राफेल कराराबाबत नवनव्या खोट्या बाबी शोधून काढत आहेत. ते भ्रमात असून भारतीय नागरिक त्यांच्यापेक्षा प्रगल्भ आहेत, असा टोला केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी लगावला आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)