प्रसारमाध्यम स्वातंत्र्य क्रमवारीत भारताची 2 स्थानांची घसरण

लंडन (ब्रिटन) – वृत्तपत्र स्वातंत्र्य क्रमवारीत भारताची 2 स्थांनाची घसरण झाली असून आता भारत 138 व्या स्थानावर गेला आहे. आरएसएफ (रिपोर्टस विदाऊट बॉर्डर्स) या दक्षता समितीने आपल्या वार्षिक अहवालात या गोष्टीची नोंद घेतली आहे. गौरी लंकेशसारख्या पत्रकारांवर झालेले हल्ले हे या घसरणीमागचे मुख्य कारण असल्याचे सांगण्यात आले आहे.
या क्रमवारीत नॉर्वे अग्रस्थानी आहे. सलग दुसऱ्या वर्षी नॉर्वेने प्रसारमाध्यम स्वातंत्र्य क्रमवारीत प्रथम स्थान पटकावले आहे. उत्तर कोरियाने सर्वाधिक दडपशाहीचा देश म्हणून आपले शेवटचे स्थान कायम राखले आहे. त्याखालोखाल एरिट्रिया, तुर्कमेनिस्तान, सीरिया आणि चीन यांचे क्रमांक लागतात.

180 देशांमध्ये भारताचा क्रमांक 136 वरून138वर घसरला आहे. हेटक्राईम-द्वेषअपराध ही भारतासमोर असणारी एक मोठी समस्या असल्याची नोंद घेण्यात आलेली आहे. सन 2014 मध्ये नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यानंतर हिंदू मूलतत्त्ववादी आक्रमक झाल्याचे सांगितले जाते. गेल्या वर्षी सप्टेंबर महिन्यात पत्रकार गौरी लंकेश हिची तिच्या घराजवळच गोळ्या घालून हत्या करण्यात आल्याची निंद आरएसएफ ने घेतली आहे. पत्रकारांवरील शारीरिक हल्ले हे भारताची क्रमवारीतील घसरण होण्यामागचे मुख्य कारण सांगण्यात आले आहे.
या बाबतीत चीनच क्रमांक गेल्यावर्षीप्रमाणेच 180 देशांमध्ये 175 वा आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

1 COMMENT

  1. वरील वृत्त वाचण्यात आले प्रसार माध्यमात चीन ह्या देशाचा क्रमांक १७५ जरी असला तरी तो देश सर्वच बाबतीत महासत्तेच्या क्रमवारीत २ नंबरवर आहे आता आपल्या देशाचा विचार करता आपल्या देशातील किती प्रसार माध्यमे हे राजकारण्यांची अथवा राजकारणाशी संबंधित असलेल्या व्यक्तींच्या मालकीची आहेत ? ह्याचे संशोधन होणे गरजेचे वाटत नाही का ?

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)