प्रसन्ना खेडेकर आणि नंदिनी पेठकर यांना दुहेरी मुकूट 

संग्रहित छायाचित्र
महापौर चषक जलतरण स्पर्धा 
पुणे  – प्रसन्ना खेडेकर आणि नंदिनी पेठकर यांनी 16 वर्षांखालील मुले व मुलींच्या गटांत 100 मी. बटरफ्लाय आणि 100 मी. बॅकस्ट्रोक प्रकारात सुवर्णपदक पटकावताना महापौर चषक जलतरण स्पर्धेत दुहेरी मुकुटाचा मान मिळविला. तसेच रिया ताओरीने देखील 15 वर्षांखालील दोन्ही प्रकारांमध्ये सुवर्णपदक कमावताना चमकदार कामगिरी केली.
पुणे महानगरपालिकेने आयोजित केलेल्या महापौर चषक जलतरण स्पर्धेचे उद्‌घाटन साहाय्यक आयुक्‍त (क्रीडा) किशोरी शिंदे यांच्या हस्ते झाले. यावेळी विविध वयोगटात बटरफ्लाय आणि बॅकस्ट्रोक या प्रकारात स्पर्धा घेण्यात आल्या. या स्पर्धांमध्ये प्रसन्ना खेडकर, नंदिनी पेठकर, मनीष खोमणे, रिया ताओरी, अथर्व पै, नेहा सगरे, तनीश कुदळ, श्रुती ठाकूर, अर्णव भाडेकर नित्या खिंवसरा यांनी 100 मीटर बटरफ्लाय प्रकारात विविध वयोगटात सुवर्णपदक पटकावले.
यावेळी 100 मी. बॅकस्ट्रोक प्रकारात प्रसन्ना खेडकर, नंदिनी पेठकर, तन्मय ठाकूर, रिआ ताओरी, अनीश पटवर्धन, मेदीनी जोशी, अन्वेश प्रसादे, श्रुती ठाकूर, अर्नव भाडेकर आणि नित्या खिंवसरा यांनी आपापल्या गटांत सुवर्णपदकावर आपले नाव कोरले. तर 50 मीटर बटरफ्लाय प्रकारात सार्थक जक्‍कल, संजना पाला, शाश्‍वत भोमे, अरात्रिका बिस्वास, ऋषी भगत, मिल्सी मकवान, वरद कदम, साराक्षी दांगट, चैतन्य पारेख, झील मालानी, वरद भोर व शिवानी कुऱ्हाडे यांनी आपापल्या गटांत सुवर्णपदक पटकावले.
सविस्तर निकाल पुढीलप्रमाणे – 
100 मी. बटरफ्लाय –
16 वर्षांखालील मुले – 1) प्रसन्ना खेडेकर, 2) शुभम धायगुडे, 3) राहुल शिंदे, मुली – 1) नंदिनी पेठकर, 2) रिद्धी हगवणे,
15 वर्षांखालील मुले – 1) मनीष खोमने, 2) तन्मय ठाकूर, 3) युवराज वालिया, मुली – 1) रिया ताओरी, 2) आर्या पिलखाने, 3) वैष्णवी मोरे,
14 वर्षांखालील मुले – 1) अथर्व पै, 2) ओम दळवी, 3) केशव सातपुते, मुली – 1) नेहा सगरे, 2) अवनी हयातनगरकर, 3) स्नेह गोयाल,
13 वर्षांखालील मुले – 1) तनीश कुदळ, 2) अन्वेश प्रसादे, 3) आरुश बढे. मुली – 1) श्रुती ठाकुर, 2) स्वरा शिंदे, 3) सिया शेट्टी,
12 वर्षांखालील मुले – 1) अर्णव भाडेकर, 2) चैतन्य पाटील, 3) अमेय पालमवार, मुली – 1) नित्या खिंवसरा, 2) परी पाटील, 3) चैत्राली राणे,
50 मी. बॅकस्ट्रोक –
11 वर्षांखालील मुले – 1) सार्थक जकाळ, 2) अर्णव शेट्टी, 3) अर्चित जोशी, मुली – 1) संजना पाला, 2) ऋतुजा राजज्ञा, 3) सृष्टी थोटापल्ली,
10 वर्षांखालील मुले – 1) शाश्‍वत भोमे, 2) आरव हेगडे, 3) अर्जुन साठे, मुली – 1) अरात्रिका बिस्वास, 2) सई कामत, 3) रीवा शेट्टी,
9 वर्षांखालील मुले – 1) रिशी भगत, 2) सम्यक रामचंद्रे, 3) आयुश गायकवाड, मुली – 1) मिल्सी मकवाना, 2) रुची भगत, 3) समृद्धी मारणे,
8 वर्षांखालील मुले – 1) वरद कदम, 2) वरद मारणे, 3) आयुष पुंडे, मुली – 1) साराक्षी दांगट, 2) त्विषा दीक्षित, 3) आभा फाटक,
7 वर्षांखालील मुले – 1) चैतन्य पारेख, 2) हर्षल हझारिका, 3) विहान सराफ, मुली – 1) झील मालानी, 2) ध्वजा जैन, 3) स्वरा जोशी,
6 वर्षांखालील मुले – 1) वरद भोर, 2) रोनव चापळकर, 3) वरद देशपांडे, मुली – 1) शिवानी कुऱ्हाडे, 2) अनुजा भावसार, 3) काव्या रिसबुड.
100 मी. बॅकस्ट्रोक –
16 वर्षांखालील मुले – 1) प्रसन्ना खेडकर, 2) पार्थ मेढी, 3) शुभम धायगुडे, मुली – 1) नंदिनी पेठकर, 2) रिद्धी हगवणे, 3) साक्षी शिरोड,
15 वर्षांखालील मुले – 1) तन्मय ठाकूर, 2) अर्जुन खिंवसरा, 3) मनीष खोमणे, मुली – 1) रीआ ताओरी, 2) रुचिता कदम, 3) वैष्णवी मोरे,
14 वर्षांखालील मुले – 1) अनिश पटवर्धन, 2) अजिंक्‍य गवळी, 3) अद्वैत गावडे, मुली – 1) मेदिनी जोशी, 2) अवनी हयातनगरकर, 3) लाब्धी लुंकड,
13 वर्षांखालील मुले – 1) अन्वेश प्रसादे, 2) रुद्र इंगळे, 3) तनिष कुदळे, मुली – 1) श्रुती ठाकूर, 2) श्‍वेता कुराडे, 3) सिया शेट्टी,
12 वर्षांखालील मुले – 1) अर्णव भाडेकर, 2) चैतन्य पाटील, 3) अमेय पालमवार, मुली – 1) नित्या खिंवसरा, 2) ऱ्हिया शिंगोटे, 3) ऋतुजा नाडगौडा.

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)