प्रश्‍न सुटता सुटे ना!

  • खेड तालुका वार्तापत्र

खेड तालुक्‍यातील काही महत्त्वाचे प्रश्‍न सुटता सुटत नाहीत. यासाठी प्रभावी अशी उपाययोजना होत नसल्याने सर्वसामान्य नागरिकांचे हाल होत आहेत. याकडे शासन आणि तालुक्‍यातील पुढारी लक्ष देत नसल्याने तालुक्‍यातील प्रश्‍न सुटता सुटत नाहीत. दिवसेंदिवस तालुक्‍यातील महत्त्वाचे प्रश्‍न गंभीरच होत चालले आहेत. हे प्रश्‍न सोडविण्यासाठी सर्व पक्षीय नेत्यांनी एकत्रित प्रयत्न होणे गरजेचे आहे. नाहीतर राजकारणात तालुक्‍यातील प्रश्‍न आणखीनच गंभीर होतील.
पुणे-नाशिक महामार्गावरील वाहतूककोंडी, राजगुरुनगर बाह्यवळण रस्ता, आळंदी राजगुरुनगर,चाकण कचरा प्रश्‍न, भामा आसखेड, चासकमान धरण, कळमोडी धरण धरणग्रस्तांचे प्रश्‍न, हुतात्मा राजगुरू राष्ट्रीय जन्मस्थळ स्मारक, तालुक्‍यातील रस्त्यांचे झालेली चाळण, वाढती बेकारी आणि कायदा सुव्यवस्था आदि प्रश्‍न गंभीर बनले आहेत ते सोडविण्यासाठी शासन दरबारी उदासीनता आहेच मात्र, स्थानिक पातळीवरचे नेते अजूनही त्यावर पाहिजे त्याप्रमाणात आवाज उठवत नाहीत. नव्हे जेव्हा लोक रस्त्यावर येतात त्यावेळी ते जागे होतात, अशी परिस्थिती आहे. याबबत नागरिकांमध्ये मोठी चर्चा होत आहे.
राजगुरुनगर, चाकण आणि आळंदी ही तालुक्‍यातील तीन अतिमहत्त्वाची शहरे बनली आहेत. शहराचा विकास होणे गरजेचे आहे. देशभरातील नव्हे जगातील नागरिक चाकण औद्योगिक क्षेत्रामुळे जोडला गेला आहे. त्यामाध्यमातून खेड तालुक्‍याचे नाव जगाच्या इतिहासात गेले आहे मात्र, तालुक्‍यातील अनेक समस्यांमुळे येथे रहाणे, येणे जाणे दिवसागणिक अवघड बनले आहे. वाढती वाहतूककोंडी, अपुरी कायदा सुव्यवस्था, पाणी, वीज, आरोग्य, वाहतूक यांच्या मोठ्या समस्यांमुळे औद्योगिकीकरणावर मोठा परिणाम होत आहे. याचा मोठा परिणाम आगामी काळात तालुक्‍याला सहन करावा लागणार आहे अशी परिस्थिती उद्‌भवली आहे.
तालुक्‍यात तीन धरणे असूनही तालुका तहानलेला आहे. त्यांना या धरणाच्या पाण्याचा उपयोग होत नाही. तालुक्‍यातील पाणी इतर तालुक्‍यांना पुणे शहराला देण्याचा शासन प्रयत्न करीत आहेत नव्हे तेथील पुढारी नेत्यांचे प्रयत्न आहेत. मात्र स्थानिक नेत्यांना अजूनही धरणग्रस्त शेतकऱ्यांचे प्रश्‍न सोडवता आले नाहीत. धरणग्रस्तशेतकरी त्यांच्या समस्या सोडविण्यासाठी त्यांच्या हिमतीवर शासनाच्या विरोधात लढाई लढत आहे. धरणग्रस्त शेतकऱ्यांचे प्रश्‍न सोडवा मग पाणी न्या असा न्याय सरकारकडे मागत आहेत.
खेड तालुक्‍यात राजगुरुनगर, चाकण परिसरात पुणे नाशिक महामार्गावर वाहतूक कोंडीचे मोठे संकट आले आहेत. ते सोडविण्यासाठी सक्षम प्रयत्न होणे गरजेचे आहेत. बाह्यवळणरस्ता मार्गी लावणे चाकण चौकात उड्डाण पूल होणे नितांत गरजेचे आहे. राजगुरुनगर, चाकण आणि आळंदी शहराचा कचरा प्रश्‍न गांभीर्याने सोडविणे आवश्‍यक आहे. पिण्याच्या पाण्याची समस्या पूर्व भागात सतावत आहे धरणातून त्यासाठी चांगली योजना राबविणे आवश्‍यक आहे. शासन पातळीवर त्यासाठी सामूहिक प्रयत्न होणे गरजेचे आहे. स्थानिक बेरोजागांना नोकऱ्या मिळण्यासाठी आवश्‍यक ते मार्गदर्शन व प्रशिक्षण योजना राबविणे गरजेचे आहे.
एकूणच तालुक्‍यातील विविध प्रश्‍नांसाठी पक्षीय राजकारण बाजूला ठेवून आता एकजुटीने आवाज उठविण्याची वेळ आली आहे. सर्वांनी त्यासाठी एकत्रित प्रयत्न होणे आवश्‍यक आहे. सर्च पक्षाचे नेते कार्यकर्ते एकत्र येणार नाहीत अशी सध्या परिस्थिती असली तरी तालुक्‍यातील समस्या सोडविण्यासाठी कुणी तरी पुढाकार घेणे गरजेचे आहे हेही तितकेच प्रकर्षाने जाणवत आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)