प्रशिक्षणासाठी 45 अधिकारी मुळशीत दाखल

मुख्यालय वाऱ्यावर : एकाच वेळी सर्व अधिकारी रवाना

पिंपरी – पिंपरी-चिंचवड महापालिकेतील आयुक्त, अतिरिक्त आयुक्तांसह सर्व विभाग प्रमुख असे 45 अधिकारी मुळशीतील निसर्गरम्य “गरुडमाची’कडे रवाना झाले आहेत. शुक्रवारी (दि.29) दुपारपासूनच अधिकाऱ्यांची जाण्याची लगबग सुरु होती. त्यामुळे महापालिकेत शुकशुकाट पसरला आहे. विशेष म्हणजे पावसाळा सुरु असताना एकाचवेळी सर्व अधिकाऱ्यांनी महापालिका मुख्यालय सोडले आहे. सध्या पावसाळा सुरु असून आपत्कालीन परस्थिती निर्माण झाल्यास ती एकही जबाबदार अधिकारी उपलब्ध नाही.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

स्मार्ट सिटी अभियानासाठी गतिमानता आणणे आणि शहर परिवर्तन कामकाजाचे धोरण आखण्यासाठी महापालिकेतील सर्व अधिकाऱ्यांची मुळशीतील गरूडमाची येथे शुक्रवारी (दि.29) आणि शनिवारी (दि.30) दोन दिवसीय कार्यशाळा आयोजित केली आहे. या कार्यशाळेत आयुक्त, अतिरिक्त आयुक्त यांच्यासह सर्व विभागप्रमुख आणि पॅलॅडियम ग्रुपचे सदस्य असे 50 जण सहभागी झाले आहेत.

मुळशीकडे जाण्याची अधिकाऱ्यांची आज दुपारपासूनच लगबग सुरु होती. अनेक अधिकारी दुपारनंतरच घरी गेले होते. चारनंतर पालिकेत एकही अधिकारी हजर नव्हता. संपूर्ण पालिकेत शुकशुकाट होता. एरव्ही कायम नागरिकांच्या गर्दीने गजबजलेल्या असलेल्या चौथ्या मजल्यावर देखील शुकशुकाट होता. अधिकाऱ्यांनी फिरण्यासाठीचे सर्व साहित्य सोबत नेले आहे. त्यामुळे अधिकारी कार्यशाळेसाठी गेले आहेत की फिरण्यासाठी असा सवाल उपस्थित केला जात आहे. अधिकारी नसल्यामुळे सत्तारुढ व विरोधी पक्षनेत्यांव्यतिरिक्त अन्य पदाधिकारी देखील दुपारनंतर महापालिकेत फिरकले नाहीत.

एकाचवेळी सर्व अधिकाऱ्यांना मुख्यालय सोडता येत नाही. कार्यालयीन सुट्टी दिवशी देखील मुख्यालय सोडता येत नाही. परंतु, उद्या कार्यालयीन कामकाज सुरु असून देखील एकाचवेळी सर्व अधिकाऱ्यांनी पालिका मुख्यालय सोडले आहे. त्यामुळे अधिकाऱ्यांच्या धाडसाबाबत आश्‍चर्य व्यक्त केले जात आहे. सध्या पावसाळा सुरु असून आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाल्यास उपाययोजना करण्यासाठी एकही अधिकारी उपलब्ध नाही. तसेच उद्या (शनिवारी) देखील महापालिकेचे कार्यालयीन कामकाज पुर्णपणे बंद राहणार आहे. कार्यशाळेवर सव्वा दोन लाखांचा खर्च होणार असून हा खर्च थेट पध्दतीने केला जाणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)