प्रशिक्षणानंतर 103 विद्यार्थी ‘लष्करी’ सेवेत

लष्करी वैद्यकीय महाविद्यालयाचा दीक्षांत सोहळा उत्साहात

पुणे : “कदम कदम बढाए जा’ गाण्याच्या चालीवर विद्यार्थ्यांचे शिस्तबद्ध संचलन, हवाई दलाच्या “आकाशगंगा’ या तुकडीद्वारे सादर करण्यात आलेली स्कायडायव्हिंगचे प्रात्यक्षिक, मद्रास रेजिमेंटच्या जवानांनी सादर केलेली “कलरीपायतू’ या युद्धकलेचे सादरीकरण आणि नौदलाच्या बॅन्ड पथकाचे वाजन अशा उत्साही वातावरणात लष्करी वैद्यकीय महाविद्यालयाच्या (ए.एफ.एम.सी) 52 व्या तुकडीचा दीक्षांत सोहळा बुधवारी झाला.

 

वैद्यकीय शिक्षणासोबतच एक अधिकारी ते ही भारतीय लष्करातील अधिकारी म्हणून तुम्ही निवडले जाता, तो तुमच्या आयुष्यातील सर्वोच्च आनंदाचा आणि अतिशय अभिमानाचा क्षण असतो. तीच अनुभूती आज होत आहे. माझ्या आणि माझ्या कुटुंबियांच्या जीवनातील हा एक ऐतिहासिक क्षण आहे.
– हरीश पंत, कलिंगा सन्मान विजेता

दीक्षांत समारोहात लष्करी वैद्यकीय सेवेचे महासंचालक लेफ्टनंट जनरल बिपीन पुरी यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना सन्मानित करण्यात आले. यावेळी शैलजा त्रिपाठी हिला “प्रेसीडेंट गोल्ड मेडल’ तर हरीश पंत याला “कलिंगा’ पुरस्काराने गौरविण्यात आले. यावेळी महाविद्यालयाचे संचालक एअर मार्शल सी. के. रंजन, अधिष्ठाता मेजर जनरल माधुरी कानिटकर यांची उपस्थिती होती. यंदा 103 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. यापैकी 89 विद्यार्थी सैन्यदलात, सहा नौदलात तर आठ हवाईदलातील सेवेत रुजू होतील.

लेफ्टनंट जनरल पुरी म्हणाले, लष्करी वैद्यकीय सेवा हा एक अनोखा अनुभव आहे. याठिकाणी काम करताना तुम्हाला विविध आघाड्यांवर काम करावे लागते. ज्याप्रमाणे येथे अनेक संधी उपलब्ध आहेत, त्याचप्रमाणे काही वेळा कठोर निर्णयही घावे लागतात. मात्र, यातच तुमचे व्यक्तिमत्व, व्यावसायिकता आणि नेतृत्वगुण या तिन्हींची कसोटी असते. अशावेळी तुमची भूमिका महत्त्वाची ठरते. मन लावून काम करा आणि यशस्वी व्हा. यावेळी झालेल्या संचलनाचे नेतृत्व सर्जिकल सब लेफ्टनंट अब्बास गाझी नक्वी यांनी केले.

पाचवी पिढी लष्करात :
लष्करी वैद्यकीय महाविद्यालयातून 1987 साली पासाऊट झालेले कर्नल के. एस. ब्रार यांची पाचवी पिढीही लष्करात दाखल झाली. त्यांचा मुलगा अनिकेतसिंग ब्रार याने लष्करी वैद्यकीय महाविद्यालयातून शिक्षण पूर्ण केले. ब्रार यांचे अजोबा हे ब्रिटिश आर्मीमध्ये होते. घराण्याची परंपरा मुलाने कायम ठेवल्याने वडील भाऊक झाले होते.

लहानपनापासूनच आपण डॉक्‍टर व्हावे, असे वाटायचे. तसा अभ्यासही केला. मात्र, एकदा ए. एफ. एम. सी.मध्ये आले, आणि त्यानंतर याच महाविद्यालयात प्रवेश घ्यायचा असे ठरविले. आज डॉक्‍टर आणि अधिकारी अशी दोन्ही पदे मिळाली. मात्र, डॉक्‍टरच्या पांढऱ्या कोट पेक्षा लष्कराचा गणवेश अधिक चांगला वाटत आहे.
– शैलजा त्रिपाठी, प्रेसीडेंट गोल्ड मेडल विजेती


ज्याप्रमाणे काश्‍मीरला पृथ्वीवरील स्वर्ग म्हटले जाते, त्याचप्रमाणे माझ्यासाठी लष्करी वैद्यकीय महाविद्यालय हे वैद्यकीय शिक्षणाचे स्वर्ग आहे. याठिकाणी शिक्षण घेणे हा अविस्मरणीय अनुभव होता. जीवनात जेव्हा-जेव्हा संधी मिळेल तेव्हा-तेव्हा याठिकाणी येईलच, परंतु, जर पूर्नजन्म मिळाला तरीसुद्धा पुन्हा याच महाविद्यालयामध्ये शिक्षण घेण्यासाठी येईन.
– अब्बास गाझी नक्वी, संचलनाचे नेतृत्व


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
1 :thumbsup:
1 :heart:
1 :joy:
1 :heart_eyes:
1 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)