प्रशिक्षक राजू कोतवाल यांना “प्रथम क्रीडारत्न’ पुरस्कार प्रदान

पुणे – प्रथम स्पोर्टस मॅनेजमेंट यांच्यातर्फे आयोजित स्प्रिंगर नेचर पुणे आयटी करंडक स्पर्धेच्या समारोपाच्या दिवशी राजू कोतवाल यांनी क्रीडा क्षेत्रात दिलेल्या अमूल्य योगदानाबद्दल प्रथम क्रीडारत्न पुरस्काराने गौरविण्यात आले.

स्प्रिंगर नेचर पुणे आयटी करंडक स्पर्धेच्या पारितोषिक वितरणाप्रसंगी भारतीय संघाचे माजी कर्णधार व नॅशनल अकादमीचे संचालक दिलीप वेंगसरकर यांच्या हस्ते राजू कोतवाल यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
यावेळी खासदार श्रीरंग बारणे, महाराष्ट्र राज्याचे दुग्ध विकास व पशुसंवर्धन कॅबिनेट मंत्री महादेव जानकर, दौंडचे आमदार राहुल कुल, पीसीएमसीचे स्वीकृत नगरसेवक ज्ञानदेव थोरात, कॉर्पोरेट बिझनेस हेड निधी गुलाटी, शिवसेना गटनेते राहुल कलाटे, शशी काटे स्पोर्टस फाऊंडेशनचे संस्थापक शशी काटे, इंडियन बॅंकेचे सौरभ कुमार, उद्योजक अभिजीत जाधव, प्रथम स्पोर्टस्‌ मॅनेजमेंटचे चेअरमन अमित जगताप, संचालक भाऊसाहेब डांगे आणि सुजय निकम, अशोक शर्मा आदी मान्यवर उपस्थित होते.

-Ads-

राजू कोतवाल पिंपरी चिंचवड शहरात क्रिकेट या खेळाचा प्रसार व्हावा याकिरता 1990 पासून गेली 28 वर्षे सातत्याने कार्य करीत आहेत. पिंपरी-चिंचवड शहरातून अनेक राज्य व राष्ट्रीय स्तरावरील खेळाडू घडविण्यात राजू कोतवाल यांचा मोलाचा वाटा आहे.

राजू कोतवाल पीसीएमसीमध्ये क्रीडा विभाग प्रमुख म्हणून कार्यरत असून दिलीप वेंगसरकर क्रिकेट अकादमीचे ते मुख्य प्रशिक्षक आहेत. तसेच, त्यांनी सन 2003 पासून 200 हुन अधिक शालेय जिल्हास्तरीय स्पर्धांचे आयोजन केले आहे. यावेळी महाराष्ट्र राज्याचे दुग्ध विकास व पशुसंवर्धन कॅबिनेट मंत्री महादेव जानकर यांनी क्रीडा क्षेत्रात केलेल्या कार्याबद्दल राजू कोतवाल यांचे कौतुक केले व भविष्यात चांगले खेळाडू घडविण्यासाठी त्यांना शुभेच्छा दिल्या.

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)