प्रशासन विभागातील लुडबुडीला लगाम?

पिंपरी – आस्थापना विषयक कामकाजासाठी महापालिका प्रशासन विभागात वारंवार चकरा मारणाऱ्या इतर विभागातील कर्मचाऱ्यांना आता लगाम बसणार आहे. प्रशासन विभागात येणे गरजेचे असल्यास दुपारी तीननंतरच यावे, असे स्पष्ट आदेश परिपत्रकाद्वारे देण्यात आले आहेत.

महापालिका प्रशासन विभागामध्ये कर्मचाऱ्यांचे आस्थापना विषयक कामकाज चालते. त्यामुळे इतर विभागाकडील कर्मचारी कामकाजासाठी कार्यालयीन कामकाजाच्या वेळेत प्रशासन विभागात वारंवार येऊन अनेक बाबींची चौकशी करत असतात. त्यामुळे कार्यालयीन कामकाजात अडथळा निर्माण होऊन प्रशासन विभागातील कर्मचाऱ्यांना काम करणे जिकीरीचे होते. प्रशासकीय आस्थापना विषयक कामकाजासाठी संगणक प्रणाली तयार करण्यात आल्या आहेत. त्यानुसार, प्रत्येक विभागाकडून ऑनलाईन प्रस्ताव, अर्ज प्रशासनाकडे सादर करणे आवश्‍यक असते. कर्मचाऱ्यांनी आस्थापना विषयक अडचणींबाबत पहिल्यांदा त्यांच्या विभागातील आस्थापना कारकून, मुख्य कारकून, शाखाप्रमुख, विभाग प्रमुख यांच्याकडून मार्गदर्शन घ्यावे.

-Ads-

प्रशासन विभागाकडून दुरध्वनीवरून माहिती घेणे आणि आवश्‍यकता असेल तरच प्रशासन विभागात येणे अपेक्षित आहे. प्रशासन विभागात येणे गरजेचेच असेल तर दुपारी तीन नंतर येण्याबाबत तात्कालीन आयुक्तांनीही 24 सप्टेंबर 2013 रोजीच्या परिपत्रकानुसार कळविले आहे. मात्र, महापालिका कर्मचारी या सुचनांचे पालन करत नसल्याचे निदर्शनास आले आहे. कर्मचारी दिवसभर प्रशासन विभागात अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या कामात व्यत्यय निर्माण करतात. ही बाब लक्षात घेऊन महापालिका प्रशासन विभागाचे सहआयुक्त यांनी परिपत्रक जारी केले आहे.

प्रशासन विभागाकडील वैयक्तिक अथवा कार्यालयीन कामाकाजास्तव प्रशासन विभागात आवश्‍यकता असल्यास दुपारी तीननंतर यावे. या वेळेत त्यांच्या अडचणींचे निराकरण केले जाईल. त्यापूर्वी कोणीही प्रशासन विभागात येऊन प्रशासन विभागातील अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या कामात व्यत्यय निर्माण करू नये, असे स्पष्ट आदेश देण्यात आले आहेत.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)