प्रशासन गतिमान करण्यासाठी माहिती तंत्रज्ञानाचा वापर गरजेचे -डॉ.अमरेंद्र पानी

कोल्हापूर – विद्यापीठ प्रशासन गतिमान करण्यासाठी माहिती तंत्रज्ञानाचा वापर करणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन, प्राचार्य डॉ. अमरेंद्र पानी, उपसंचालक संशोधन विभाग, असोसिएशन ऑफ इंडियन युनिव्हर्सिटीज, नवी दिल्ली यांनी आज येथे केले.

प्राचार्य डॉ.पानी विद्यापीठाचे संगणकशास्त्र अधिविभाग आणि असोसिएशन ऑफ इंडियन युनिव्हर्सिटीज (एआययू), नवी दिल्ली यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित तीन दिवसीय इमर्जिंग ट्रेंडस्‌ इन इनफॉरमेशन टेक्‍नॉलॉजी इन युनिव्हर्सिटी मॅनेजमेंट या विषयावरील राष्ट्रीय कार्यशाळेचे उद्धाटन प्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून बोलत होते. विद्यापीठाच्या संगणकशास्त्र अधिविभागामध्ये कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी विद्यापीठाचे प्र-कुलगुरु डॉ.डी.टी.शिर्के अध्यक्षस्थानी उपस्थित होते.

प्राचार्य डॉ.पानी यांनी कार्यशाळेची संकल्पना तसेच असोसिएशन ऑफ इंडियन युनिव्हर्सिटीज स्थापनेचा उद्देश विशद केला. प्र-कुलगुरु डॉ.डी.टी.शिर्के अध्यक्षीय भाषणामध्ये म्हणाले, युजीसीच्या ध्येयधोरणांनुसार विद्यापीठातील विविध विभागांमध्ये माहिती तंत्रज्ञानाचा वापर चांगल्याप्रकारे होत आहे. यावेळी विद्यापीठाचे कुलसचिव डॉ.विलास नांदवडेकर यांनी बदलत्या काळानुसार संगणकीय ज्ञान आत्मसात करण्याची गरज असल्याचे मत व्यक्त केले.

संगणकशास्त्र विभागप्रमुख डॉ.आर.आर.मुधोळकर यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. डॉ.के.एस.ओझा यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले तर डॉ.यु.आर.पोळ यांनी आभार प्रदर्शन केले. या कार्यशाळेत भारतातील विविध विद्यापीठातील पन्नास पदाधिकारी सहभागी झाले असून त्यांना माहिती तंत्रज्ञानातील तज्ज्ञ मार्गदर्शन करणार आहेत. या कार्यक्रम प्रसंगी विद्यापीठाच्या विविध अधिविभागातील प्राध्यापक, तंत्रज्ञान अधिविभागाचे संचालक डॉ.जे.एस.बागी, अधिष्ठाता डॉ.पी.एस.पाटील, माजी परीक्षा नियंत्रक डॉ.बी.एम.हिर्डेकर तसेच संगणशास्त्र अधिविभागातील डॉ.व्ही.एस.कुंभार, प्रसन्न करमरकर, प्रसाद गोयल, परशुराम वडार, कबीर खराडे व प्रशासकीय कर्मचारी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)