प्रशासनावर दबाव कोण आणते हे शिवसेनेने तपासून पहावे- राम शिंदे

नगर: शिवसेनेकडून बिनबुडाचे व निराधार आरोप केले जात आहेत. भाजप कायदे पाळणार पक्ष आहे. भाजपने जर प्रशासनावर दबाव असता तर खासदार दिलीप गांधी यांचा पुत्र व सुनेचा अर्ज बाद झाला असता का? असे आरोप करणाऱ्या शिवसेनेच्या नेत्यांचा पुर्व इतिहास तपासून पहा मग समजेल प्रशासनावर कोण दबाब टाकतो असा पलटवार पालकमंत्री प्रा. राम शिंदे यांनी आ. अनिल राठोड यांचे नाव न घेता आज केला.

महापालिका निवडणूक स्वबळावर लढत असलेल्या भाजपने आज संकल्प वचननामा जाहीर केला. 42 प्लसचा दावा करीत 58 विषयांचा समावेश करून त्याची पुर्तता करण्याचे वचन नगरकरांना दिले आहे. ना. शिंदे यांच्या हस्ते वचनमान्याचे प्रकाशन करण्यात आले. यावेळी समाजकल्याण राज्यमंत्री दिलीप कांबळे, खासदार दिलीप गांधी, आमदार स्नेहलता कोल्हे, आमदार मोनिका राजळे, आमदार बाळासाहेब मुरकुटे, आमदार शिवाजीराव कर्डिले, आ. सुजितसिंह ठाकूर, रघुनाथ कुलकर्णी, विजय पुराणिक, जिल्हाध्यक्ष भानुदास बेरड, चंद्रशेखर कदम, ऍड. अभय आगरकर आदी उपस्थित होते. हा संकल्पनामा सिद्धीकडे घेऊन जाईल, असा दावा ना. शिंदे यांनी यावेळी केला. मागील सत्ताधाऱ्यांनी नगरकरांची निराशा केल्याने भाजपला पाठिंबा वाढला आहे.

या निवडणुकीत पक्षाने सर्वाच्या सर्व 68 जागांवर उमेदवार दिले आहेत. ते एकाही पक्षाला जमले नाही. भाजपने यात आघाडी घेतली. विरोधकांना सर्वच जागांवर उमेदवार देता आले नाही. त्यातून त्यांचा कमकुवतपणा समोर आला आहे. या निवडणुकीत पक्षाला 42 प्लस जागा मिळतील असा दावा त्यांनी केला.

शिवसेना चुकीचे व धादांत खोटे आरोप करीत आहे. या निवडणुकीत राष्ट्रवादी व भाजप छुप्पी युती नाही. कोणावर छुपी युती करण्याची गरज नाही. निवडणुकीत प्रशासनावर दबाब टाकण्यात आलेला नाही. शिवसेनेचा पूर्व इतिहास पाहिल्यानंतर कोण दबाव टाकते हे कळेल. उमेदवार आयात करण्यात आले असले तरी अन्य पक्षांनी काय केले आहे. हे देखील त्यांनी पहावे. निवडणुक ही जिंकण्यासाठी लढायची असते. जर आपल्याकडे निवडून येण्याची क्षमता असलेला उमेदवार नसेल तर नव्याने पक्षात आलेल्यांना संधी द्यावी लागते. सर्वच पक्षाचे हे चित्र आहे. भाजपवर आरोप करणाऱ्या शिवसेनेने किती निष्ठावंतांना उमेदवारी दिली.

शिवसेना व राष्ट्रवादीने देखील उमेदवार आयात केले आहे. नगर शहराचा चेहरामोहरा बदला पाहिजे. त्या दृष्टीने संकल्प वचननामा तयार केला असून केंद्र व राज्य सरकारच्या माध्यमातून शहरात विविध विकास कामे करून नगरकरांना मूलभूत सुविधा देण्याचा भाजपचा प्रयत्न राहिले. महापालिकेची आर्थिक स्थिती नाजूक आहे. याला मागील सत्ताधारीच कारणीभूत असून त्यांनी महापालिका खिळखिळी केल्याचा आरोप ना. शिंदे यांनी यावेळी केला.

विखे व्यक्‍तिगत मित्र-कर्डिले

राजकारणात व मैत्री वेगळी आहे. ज्या ठिकाणी राजकारण असते ते राजकारण करावे लागते. त्या ठिकाणी मैत्रीचा संबंध येत नाही. राधाकृष्ण विखे यांच्याशी माझी राजकीय मैत्री नाही तर व्यक्‍तीगत मैत्री आहे. त्यामुळे राजकारण त्यांच्याशी राजकारण करणार असे आ.शिवाजीराव कर्डिले यावेळी म्हणाले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
2 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)