प्रशासनाच्या लेखी आश्वासनानंतर कणसेवाडीतील उपोषण मागे

उपोषणकर्ते याना लेखी पत्र देताना गटविकास अधिकारी रमेश काळे, अनिल देसाई, विजय शिंदे व इतर

एक महिन्यात चौकशी करून कारवाई करण्याचे आश्वासन
वडूज, दि. 13 (प्रतिनिधी) – कणसेवाडी, ता. खटाव येथे गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या ग्रामपंचायतीच्या भ्रष्टाचार चौकशीसाठीचे उपोषण आज प्रशासनाने दिलेल्या लेखी आश्वासनानंतर सोडण्यात आले.
ग्रामपंचायतीच्या मागील एका सरपंच व ग्रामसेवकाच्या कालावधीत मोठ्या प्रमाणावर गैरव्यवहार व भ्रष्टाचार झाला आहे. या भ्रष्टाचाराची सखोल चौकशी करुन दोषींवर फौजदारी गुन्हे दाखल करावेत, या मागणीसाठी विद्यमान सदस्य संतोष किसन जाधव यांनी गावातील हनुमान मंदिरात आमरण उपोषण सुरु केले होते.
दरम्यान, आज गटविकास अधिकारी रमेश काळे, सहाय्यक बीडीओ मेढेवार, पोलीस उपनिरीक्षक पाटील व पंचायत समितीचे अधिकारी यांच्या लेखी अश्वासनाने हे आंदोलन सोडण्यात आले.
यावेळी या संदर्भात गटविकास अधिकारी रमेश काळे, भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष अनिल देसाई, संजय गांधी निराधार योजनेचे अध्यक्ष विजय शिंदे, विस्तार अधिकारी माने, उपअभियंता निलेश डेरे, शाखा अभियंता सुभाष खाडे, एस. एन. कुलकर्णी, एस. के. झेंडे आदिंनी आंदोलकांशी चर्चा विचार विनीमय करत यावर चौकशी समिती स्थापन करून एक महिन्यात सखोल चौकशी करून अहवाल सादर केला जाईल. तसेच यामध्ये दोषी असणाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल, असे लेखी आश्वासन यावेळी प्रशासनाने उपोषणकर्ते यांना दिले.

पोलीस फौजफाटा अन्‌ आरोग्य कर्मचारी
गेल्या दोन दिवसापांसून सुरू असलेल्या या उपोषण ठिकाणी एकही पोलीस कर्मचारी व आरोग्य कर्मचारी फिरकला नसल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला होता. मात्र आज या ठिकाणी मोठा पोलीस बंदोबस्त आणि आरोग्य कर्मचारी उपस्थित होते.

 

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)