प्रशासनाच्या प्रयत्नांवर “पाणी’

पिंपरी – मे महिन्यापासून नळजोड सर्व्हेक्षणात शहरात 14 हजार 447 अनधिकृत नळजोड आढळले. मात्र नळजोड अनधिकृत करण्याच्या पाणी पुरवठा विभागाच्या आवाहनाला अनधिकृत नळ जोड धारकांनी गांभिर्याने घेतले नाही. वारंवार वाढीव मुदतीत केवळ 2 हजार 298 अर्ज आले. त्यापैकी केवळ 1 हजार 627 अर्ज पाणी पुरवठा विभागाने मंजूर केले. त्यामुळे आता महापालिकेचा पाणी पुरवठा विभाग या अनधिकृत नळ जोड धारकांवर कोणती कारवाई करणार? याकडे लक्ष लागले आहे.

महिन्यापासून शहरात पाणी पुरवठा विस्कळीत होत आहे. अवैध नळजोड चुकीच्या पद्धतीने केल्याने गळतीतून दुषित पाणी पुरवठा होतो. अधिकृत नळजोड करण्यासाठी 31 ऑक्‍टोबर व त्यानंतर 15 नोव्हेंबरपर्यंत महापालिकेने मुदत वाढवली होती. तसेच फौजदारी गुन्हे दाखल करण्याचा इशारा दिला, मात्र नागरिकांचा प्रतिसाद मिळत नसल्याचे दिसून आले.

महापालिकेत नव्याने निर्माण केलेल्या ह-प्रभागात सर्वाधिक म्हणजेच 5 हजार 767 अनधिकृत नळजोड आहेत. अ-प्रभागात सर्वांत कमी 209 अनधिकृत नळजोड आहेत. त्यापैकी 21 जणांनी अर्ज केले व सर्व अर्ज मंजूर केले. ब-प्रभागात अनधिकृत 2 हजार 8 नळजोड पैकी 577 अर्ज आले व 497 मंजूर केले. क-प्रभागात अनधिकृत 2 हजार 185 पैकी 161 अर्ज आले व 60 अर्ज मंजूर झाले. ड-प्रभागात अनधिकृत 486 नळजोड पैकी 158 अर्ज आले व 132 मंजूर झाले. ई-प्रभागात अनधिकृत 967 पैकी 73 अर्ज आले व 25 अर्ज मंजूर केले. फ-प्रभागात अनधिकृत 1 हजार 722 नळजोड पैकी 924 अर्ज आले व 731 अर्ज मंजूर झाले.
ग-प्रभागात अनधिकृत 1 हजार 103 नळजोड पैकी 279 अर्ज आले व 119 अर्ज मंजूर झाले. ह-प्रभागात अनधिकृत सर्वाधिक 5 हजार 767 नळजोड पैकी केवळ 105 अर्ज आले व 42 अर्ज मंजूर केले.
—-


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)