प्रशासनाची निर्णायक भूमिका, शेतकरी अंधारातच

संत तुकाराम महाराज पालखी मार्ग भूसंपादन प्रक्रिया अंतिम टप्प्यात

वासुंदे- संत तुकाराम महाराज पालखी मार्गाच्या चौपदरीकरणाचे काम केंद्र सरकारच्या सडक परिवहन मंत्रालयाने हाती घेतले असून पालखी मार्गाची भूसंपादन प्रकिया अंतिम टप्प्यात आहे. मात्र, या मार्गास संपादित करण्यात येणाऱ्या जमिनीचा मोबदला अद्याप जाहीर न झाल्यामुळे संभ्रमावस्थेतील शेतकरी सरकारविरोधी भूमिकेत आहेत. शेतकरी तीव्र आंदोलन उभारण्याच्या तयारीत असून, पाटस, वासुंदे, हिंगणीगाडा, रोटी, उंडवडी, खराडेवाडी, उडंवडी क. प. बारामती बाह्य वळणासाठी राष्ट्रीय महामार्ग 65 च्या चौकापासून सुरू होणाऱ्या पालखी मार्गाची भूसंपादन प्रकिया अंतिम टप्प्यात आहे.
या कामासाठी पुणे जिल्ह्यासह, सोलापूर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात जमिनी संपादित करण्यात येणार आहेत; परंतु सरकारच्या धोरणात्मक वृत्तीमुळे मोबदला दर निश्‍चित झालेला नाही, त्यामुळे बाधीत शेतकरी संभ्रमावस्थेत आहेत, त्यामुळे आगामी काळात विकासकामांनाही खिळ पडण्याची शक्‍यता आहे.
दौंड तालुक्‍यातील पाटस, रोटी, हिंगणीगाडा आणि वासुंदे या गावांतील जमिनी संपादित होणार आहेत. या रस्त्यासाठी भूखंड संपादित करण्यात येणाऱ्या मोकळ्या जमिनीचे विवरण सडक परिवहन आणि राजमार्ग मंत्रालयाने 4 एप्रिल 2018 रोजी अधिसूचनेद्वारे प्रसिद्ध केले होते. संबधित जमिनीशी हितसंबंध आहेत त्यांनी 4 एप्रिलपासून 21 दिवसांच्या आत आक्षेप आणि हरकती उपजिल्हा अधिकारी (भूमी संपादन) यांच्याकडे लेखी स्वरूपात नोंदविल्यामुळे आणि रीतसर गावात येऊन चर्चा केल्याशिवाय मोजणी आणि अन्य कोणतेही काम करू न देण्याचा आक्रमक पवित्रा घेतला होता. याचीच दखल घेत सरकारच्या वतीने दिनांक 3 मे 2018 रोजी उपजिल्हाधिकारी सुनील गाढे (प्रभारी) भूसंपादन क्र. 11 यांनी वासुंदे येथे येऊन भैरवनाथ मंदिरात बाधित शेतकऱ्यांसमवेत सकारात्मक चर्चा केली होती. संपादित जमिनीचा मोबदला नक्कीच चांगला मिळेल आणि नॅशनल हायवेला नवीन भूसंपादन ऍक्‍टनुसारच संपादन होणार आहे, असे आश्वासन उपजिल्हाधिकारी सुनील गाढे यांनी दिल्यामुळे संभ्रमावस्थेत असलेल्या शेतकरी वर्गात समाधानाचे वातावरण होते; परंतु त्यानंतर हे संपादनाचे काम काही कारणास्तव उपविभागीय अधिकारी बारामती यांच्याकडे सोपवण्यात आले आहे. त्यानंतर गतिमान असलेली भूसंपादन प्रकिया सुस्त झाल्याची चर्चा गावागावातील चौकात ऐकायला मिळत आहे.

  • प्रतीगुंठा आठ लाख रुपये आणि महामार्गामध्ये जाणाऱ्या दीर्घायुष्यी झाडाला प्रती झाड पंधरा हजार मोबदला मिळण्याची शेतकऱ्यांची मागणी.
  • पालखी महामार्गास लवकर करायचा असल्याने सर्व प्रकिया पूर्ण करत आहे. दर निश्‍चितीचे काम सुरू आहे, प्रत्येक गावाला वेगवेगळे दर आहेत. जमिनी ताब्यात घेण्याचे काम लवकरात लवकर होईल, त्यानंतर शेतकऱ्यांना मोबदला दिला जाईल.
    – हेमंत निकम , उपविभागीय अधिकारी, बारामती.
  • या जमिनी कायमच्याच जाणार आहेत, त्यामुळे एक प्रकल्प एक मोबदला किंवा भरघोस मोबदला दिल्यावर संपादनाचा मार्ग सुकर होऊ शकतो.
    बाधित शेतकरी,
-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)