प्रशासनाचा सावळा गोंधळ; फरशीवर खेळवले ‘कराटे’चे सामने

नितिन शेळके

अहमदनगर येथील जिल्हा क्रीडा संकुलात गेल्या दि. १० ते १२ सप्टेंबर दरम्यान क्रीडा व युवक सेवा संचनालय यांच्या वतीने शासकीय स्तरावर आयोजित स्पर्ध्येत विद्यार्थ्यांकडून अंधारात आणि रबरी गालिच्याशिवाय (मॅट) गुळगुळीत फरशीवर कराटेचे सामने उरकून घेतल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याबाबत अधिक माहिती अशी कि, दरवर्षी शासकीय स्तरावर घेतल्या जाणाऱ्या जिल्हा कराटे स्पर्धेचे आयोजन वरील ताराखेंप्रमाणे करण्यात आले होते. स्पर्धेसाठी जिल्ह्याभरातुन जवळपास तीनशेहून अधिक विद्यार्थी व विद्यार्थिनी स्पर्धेत भाग घेण्यासाठी आले होते, संगमनेरातूनही जवळपास ५० मुले यात सहभागी झालेले होते.

कराटेचे सामने जमिनीवर जरी भरवले गेले असले तरी त्यापासून कोणत्याही विद्यर्थ्याला दुखापत वगैरे झालेली नाही. सामान्यांसाठी दिवसभर पुरेसा सूर्यप्रकाश होता परंतु शेवटचे दोन सामने फक्त अंधारात घेतली गेली. आयोजनासंदर्भात कोणाला काही अडचण होती तर त्यांनी माझ्याकडे आधी तक्रार करायला पाहिजे होती. हा वैयक्तिक हेव्यादाव्यांचा मुद्दा असल्याने, मी याबद्दल काही सांगू शकत नाही. :- उदय जोशी, जिल्हा क्रीडा अधिकारी, अहमदनगर

यावेळी सदरील सामने हे अंधारात व मोबाईल बॅटरीच्या प्रकाशात खेळवले जात असल्याचे विद्यार्थीनी त्याचे चित्रीकरण मोबाईलमध्ये काढण्याचा प्रयत्न केला. यावेळी आयोजकांकडून मुलांना शिवीगाळ व धमकाविण्याचा प्रयत्न झाला. विद्यार्थ्यांनी हि बाब त्यांच्या प्रशिक्षकांना लक्षात आणून दिली. प्रशिक्षकांना ताबडतोब याबाबत महाराष्ट्र कराटे असोसिएशनच्या सचिवांना सदरील बाब कळवली. याचा राग मनात धरून आयोजकांपैकी एक असलेले घनशाम सानप यांनी कराटे प्रशिक्षक व संगमनेर कराटे असोसिएशनचे अध्यक्ष लक्ष्मण शिवाजी तनपुरे यांना फोनवरून शिविगाळ व जीवे मारण्याची धमकी दिली. याबाबत लक्ष्मण तनपुरे यांनी संगमनेर शहर पोलिसांत आयोजक घनशाम सानप यांच्या विरोधात तक्रार केली असून पोलिसांकडून अदखलपात्र गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.

कसे केले गेले आयोजन

– मॅटवरील (रबरी गालिचा) सामने अपेक्षित असताना गुळगुळीत फरशीवर खेळवले सामने

– विद्यार्थ्यांना सकाळी ९ वाजता मैदानावर बोलावून दुपारी दीड वाजता सामने सुरु

– रात्री ८ वाजेपर्यंत अंधारात, मोबाईल बॅटरीच्या प्रकाशात खेळवले गेले सामने

– विद्यार्थीनींसाठी कपडे बदलण्यासाठी स्वतंत्र व्यवस्था नसल्यामुळे मुलींनी टॉयलेटचा केला वापर

– तालुकास्तरावर सामने रद्द करून थेट जिल्ह्यास्तरीय सामने खेळवले गेले.

– सामान्यांसाठी सात पंचांची आवश्यकता असताना केवळ दोनच पंचांकडून सर्व सामन्यांचे निरीक्षण


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)