कुरवली- इंदापूर तालुक्‍यातील प्रश्‍नांवरील प्रशासकीय निर्णय तातडीने घेवू, असे तहसिलदार सोनाली मेटकरी यांनी सांगितले. भाजप युवामोर्चा यांच्यावतीने उपाध्यक्ष गजानन वाकसे यांनी स्वागत केले. त्यावेळी त्या बोलत होत्या.
इंदापूरच्या तहसिलदार मेटकरी यांनी भाजपा युवामोर्चाचे पुणे जिल्हा व तालुका पदाधिकाऱ्यांशी भटके विमुक्त लोकांचे दाखले व अन्य विविध प्रश्‍नांवरही सकारात्मक चर्चा केली. याप्रसंगी उपाध्यक्ष वाकसे यांच्यासह सरचिटणीस संतोष भोसले, शाखा अध्यक्ष हनुमंत निंबाळकर, रूपेश राऊत, बोरी ग्रामपंचायत सदस्य हरिभाऊ वाघमोडे, बाळा घोरपडे व अन्य कार्यकर्ते उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)