प्रशांत माने यांना विशेष सेवा पदक

शिक्रापूर- शिक्रापूर (ता. शिरुर) पोलिस ठाण्यात कार्यरत असलेले पोलिस उपनिरीक्षक प्रशांत सदाशिव माने यांना पोलिस अधिक्षक मो. सुवेज हक यांच्या हस्ते शासनाचा “विशेष सेवा पदक’ देऊन सन्मान करण्यात आला. गडचिरोलीसारख्या नक्षलग्रस्त भागामध्ये केलेल्या उल्लेखनिय कार्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला.
प्रशांत माने यांनी 2014 ते 2016 साली केलेल्या कामगिरीबाबत प्रजासत्ताक दिनानिमित्त पोलिस अधिक्षक कार्यालय, पुणे येथे त्यांचा शासनाच्या वतीने विशेष सेवा पदक देऊन गौरविण्यात आले आहे. यावेळी पुणे ग्रामीणचे पोलिस अधिक्षक मो. सुवेज हक, पोलिस उपअधिक्षक गृह विभाग बरकत मुजावर, अप्पर पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते, तसेच जिल्ह्यातील विविध ठिकाणचे पोलिस निरीक्षक, उपनिरीक्षक उपस्थित होते. प्रशांत माने यांना मिळालेल्या विशेष सेवा पदकाने त्यांचे शिक्रापूर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक रमेश गलांडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक अतुल भोसले यांसह सर्व पोलिस कर्मचारी व अनेक मान्यवरांनी त्यांचे अभिनंदन केले. शिक्रापूर परिसरातून माने यांचे कौतुक होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)