प्रवेश रद्द करताना विद्यार्थ्यांची संस्थास्तरावर अडवणूक

अभियांत्रिकी, फार्मसी, हॉटेल मॅनेजमेंट अभ्यासक्रमातील प्रकार

पुणे – अभियांत्रिकी, फार्मसी, हॉटेल मॅनेजमेंट अॅन्ड केटरिंग टेक्‍नॉलॉजी यासह अन्य व्यावसायिक अभ्यासक्रमास प्रवेश संस्थास्तरावर होत असून, त्यासाठी दि. 31 ऑगस्टपर्यंत “डेडलाईन’ देण्यात आली आहे. मात्र, एखाद्या विद्यार्थ्यांना प्रवेश रद्द करावयाचा असेल तर, संस्थांनी एक हजार वजा करून उर्वरित शुल्क विद्यार्थ्यांना देणे बंधनकारक आहे. मात्र, ही रक्‍कम देण्याऐवजी विद्यार्थ्यांची अडवणूक केली असल्याचे दिसून येत आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

व्यावसायिक अभ्यासक्रमास प्रवेशासाठी आणखी दोन दिवसांची मुदत आहे. या कालावधीत विद्यार्थ्यांनी रिक्‍त असलेल्या जागेवर संस्थास्तरावर प्रवेश घेता येऊ शकतो. त्यानुसार विद्यार्थी प्रवेश घेत आहेत. दरम्यान, तंत्रशिक्षण संचालकांनी सर्व नियमित फेरी पूर्ण झाल्यानंतर अतिरिक्‍त प्रवेश फेरी घेतली. त्यात शासकीय व खासगी शिक्षणसंस्थांमधील रिक्‍त जागेवर प्रवेश देण्यात आला. त्यामुळे काही विद्यार्थ्यांनी यापूर्वीच संस्थास्तरावर प्रवेश घेतला, त्यांनी प्रवेश रद्द करण्यासाठी संस्थांकडे धाव घेतली. मात्र, या विद्यार्थ्यांना प्रवेश रद्द करताना अडवणूक केली जात आहे.

यासंदर्भात, तंत्रशिक्षण सहसंचालक डी. आर. नंदनवार म्हणाले की, दि. 31 ऑगस्टपूर्वी विद्यार्थ्यांनी प्रवेश रद्द करण्यासाठी अर्ज केला असेल, तो प्रवेश रद्द करणे संस्थांना बंधनकारक आहे. तसेच एक हजार रूपये कमी करून उर्वरित सर्व शुल्क विद्यार्थ्यांना परत देणे आवश्‍यक आहे. मात्र, सर्व शुल्क भरा, तरच प्रवेश रद्द, अशी भूमिका काही संस्थांनी घेतली असेल तर, ती चुकीचे आहे. अशा संस्थांच्या विरोधात तक्रार आल्यास नियमानुसार कारवाई केली जाणार असल्याचे त्यांनी म्हंटले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)