प्रवेश रद्द करणाऱ्यास शुल्क परत करा; अन्यथा कारवाई

मनुष्यबळ विकास मंत्रालयाचा उच्च शिक्षण संस्थांना इशारा

नवी दिल्ली – प्रवेश रद्द करणाऱ्यास शुल्क परत करा; अन्यथा कठोर कारवाईला सामोरे जा, असा इशारा केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाने उच्च शिक्षण संस्थांना दिला आहे. मनुष्यबळ विकास राज्यमंत्री सत्यपाल सिंह यांनी बुधवारी ट्विटद्वारे इशारा दिला.

यासंदर्भात बोलताना मंत्रालयातील एक वरिष्ठ अधिकारी म्हणाला, काही संस्था शुल्क परत करत नाहीत. तर काही शुल्क परत करताना त्यात मोठी कपात करतात, असे वारंवार निदर्शनास येते. विद्यापीठ अनुदान आयोग (युजीसी) आणि अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेने (एआयसीटीई) निकष निश्‍चित केले आहेत. त्यानुसार, प्रवेश रद्द केल्यास संबंधित विद्यार्थ्याला शुल्क आणि मूळ कागदपत्रे परत करण्यास शिक्षणसंस्था बांधील आहेत. संबंधित निकषांचे पालन अभिमत विद्यापीठांसह उच्च शिक्षण संस्थांनी केले नाही; तर त्यांच्यावर कारवाई करण्याचे आदेश युजीसी आणि एआयसीटीईला देण्यात आले आहेत. प्रसंगी मान्यताही रद्द केली जाऊ शकते, अशी पुस्तीही त्या अधिकाऱ्याने जोडली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)