प्रवेशावेळी 50 टक्‍के शिक्षण शुल्क स्वीकारल्याचे द्यावे लागणार प्रतिज्ञापत्र

संस्थांना विभागीय तंत्रशिक्षण सहसंचालकांच्या सूचना


पूर्ण शुल्क घेऊन प्रवेश देण्याचा बसणार पायबंद

पुणे – राजर्षि छत्रपती शाहू महाराज शिक्षण शुल्क योजनेस पात्र विद्यार्थ्यांकडून प्रवेशाच्या वेळी 50 टक्‍के शिक्षण शुल्क घेतले जात असल्याचे प्रतिज्ञापत्र संबंधित संस्थांनी सादर करावेत, अशा सक्‍त सूचना पुणे विभागीय तंत्रशिक्षण सहसंचालकांनी दिल्या आहेत. त्यामुळे पूर्ण शुल्क घेऊन प्रवेश देण्याच्या प्रकाराला पायबंद बसण्याची चिन्हे आहेत.

आठ लाखांपेक्षा कमी उत्पन्न असणाऱ्या विद्यार्थ्यांकडून व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी प्रवेश देताना 50 टक्‍के शुल्क प्रवेशावेळी घेणे महाविद्यालयांना बंधनकारक आहे. राजर्षि शाहू महाराज शिक्षण शुल्क योजनेंतर्गत विद्यार्थ्यांचे 50 टक्‍के शुल्क राज्य शासनामार्फत संबंधित संस्थेला दिले जाते. मात्र, बहुतांश शिक्षण संस्थांनी प्रवेशावेळी विद्यार्थ्यांकडून 50 टक्‍के ऐवजी 100 टक्‍के शुल्क घेत असल्याचे तक्रारी येत आहेत. त्या पार्श्‍वभूमीवर या सूचना देण्यात आल्या आहेत.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

विभागीय सहसंचालक डॉ. डी.आर. नंदरवार म्हणाले, या योजनेंर्गत पात्र विद्यार्थ्यांकडून प्रवेशाच्या वेळी 50 टक्‍के शिक्षण शुल्कापेक्षा जास्त शुल्क घेतले असल्याचे आढळून आल्यास त्यास सर्वस्वी मी जबाबदार आहे, असेही प्रतिज्ञापत्रात प्राचार्यांना नमूद करावे लागणार आहे. यासंबंधीचा अहवाल दि. 1 सप्टेंबरपर्यंत पुणे विभागीय तंत्रशिक्षण कार्यालयाकडे सादर करणे आवश्‍यक आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)