राष्ट्रवादीचा पूनम महाजनांवर पलटवार; प्रवीण ने प्रमोद को क्यों मारा? 

मुंबई – भाजप युवा मोर्चाच्या अध्यक्ष आणि भाजप खासदार पूनम महाजन यांच्याविरोधात राष्ट्रवादी काँग्रेसने ठिकठिकाणी पोस्टर लावत पलटवार केला आहे. अहो चिऊ ताई, महाभारत, रामायण  यांचे कथानक राहू द्या, देश की जनता यह जानना चाहती है ?, प्रवीण ने प्रमोद को क्यों मारा?, असा मजकूर पोस्टरवर आहे. हे पोस्टर मुंबईत ठिकठिकाणी लावण्यात आले आहेत.

पूनम महाजन यांनी एका जाहीर सभेत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची तुलना रामायणातील मंथरा आणि महाभारतातील शकुनी मामासोबत केली होती. तसेच पूनम महाजन यांनी विरोधकांच्या महागठबंधनला महाठगबंधन असे संबोधून टीका केली होती. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसही पूनम महाजन यांच्याविरोधात पोस्टर लावत प्रश्न विचारला आहे.

जितेंद्र आव्हाडांचीही टीका 
राष्टवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड म्हणाले कि, पूनमताई महाजन, प्रमोद महाजन आणि शरदचंद्र पवार यांचे मैत्रीचे संबध आपण कसे काय विसरलात ? राजकारणातील प्रसिद्धीसाठी आपण शरदचंद्र पवार यांच्याबद्दल जे काही बोललात, त्याचे आम्हीही सभ्यता ओलांडून उत्तर देऊ शकतो.आपल्या वडीलांवर प्रविण महाजन यांनी का गोळ्या झाडल्या हे कदाचित जगाला माहित नसेल. पण, यामागील अंतर्गत राजकारण माहिती असलेला मी एक आहे. तेव्हा आमच्या बापाबद्दल बोलाल तर खबरदार सभ्यता सोडायला एक मिनीटही लागत नाही, अशा शब्दात पूनम महाजन यांच्यावर त्यांनी टीका केली.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)