प्रवीण गोपाळे यांना कृषीनिष्ठ पुरस्कार

सोमाटणे – पुणे जिल्हा परिषदेचा कृषीनिष्ठ शेतकरी पुरस्कार शिरगावचे प्रगतशील शेतकरी प्रवीण गोपाळे यांना माजी उप मुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते गणेश कला क्रीडा रंगमंच, स्वारगेट येथे देण्यात आला.

गोपाळे यांनी शेतीमध्ये आधुनिक तंत्रज्ञान वापरून अधिक उत्पादन मिळवण्याचा यशस्वी प्रयोग केला. शेतात रासायनिक खाते, कीटक नाशकांचा वापर न करता सेंद्रिय खत, कीड नाशके, जनावरांचे मल-मूत्र, गांडूळ खताचा वापर करून विक्रमी उत्पादन घेण्यात ते यशस्वी झाले. पाणी बचतीसाठी फुल शेती, भाजीपाला, उसासाठी ठिबक सिंचनचा वापर केला. जोडधंदा दुग्ध व्यवसाय केला.

पवन-मावळातील आधुनिक पोल्ट्री व्यवसाय करणारे ते पहिले शेतकरी आहेत. यापूर्वी सगुणा पोल्ट्री लिमिटेडनेही त्यांना आदर्श पोल्ट्री उत्पादक म्हणून पुरस्कार दिला होता. आधुनिक शेती करण्याचा त्यांच्या उपक्रमाचा विचार करून पुणे जिल्हा परिषदेने सर्वसाधारण गटातून कृषीनिष्ठ डॉ. अप्पासाहेब पवार पुरस्कार अंतर्गत सन्‌ 2016-17 चा कृषीनिष्ठ शेतकरी पुरस्काराने त्यांना सन्मानीत केले.

बंधू रवींद्र गोपाळे, तालुका कृषी अधिकारी विनायक कोथंबिरे, राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे जिल्हा कार्याध्यक्ष संतोष मुऱ्हे, मारुती गोपाळे, शेखर बन्साळे, सचिन घोटकुले, नीता पाडाळे, पांडुरंग पाडाळे, रोहिदास तरस, निलेश तरस, संतोष तरस, कृषी सहाय्यक रेखा पांढरे, नवीन बोराडे, प्रवीण गाडे, गोरक्षनाथ ढोरे, सुभाष धामणकर, निलेश मुऱ्हे यांनी पुरस्कार मिळाल्याने अभिनंदन केले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)