प्रवीण गादे यांचे अभियांत्रिकी परीक्षेत सुयश

भावीनिमगाव – भावीनिमगाव येथील प्रवीण सावता गादे हे भारतीय प्रौद्योगिकी संस्थान, गुवाहाटी द्वारा घेण्यात आलेल्या इंजिनिअरिंग स्नातक अभिरुची परीक्षेत विशेष प्रावीण्यासह उत्तीर्ण झाले. याअगोदर गादे वैज्ञानिक एवं औद्योगिक अनुसंधान परिषदेद्वारा घेण्यात आलेल्या राष्ट्रीय पात्रता परीक्षेमध्ये देशातून 63 वा क्रमांक मिळवून उत्तीर्ण झाले आहेत. तसेच, सेट परीक्षेतही त्यांनी देदीप्यमान यश संपादन केले आहे. प्रवीण यांचे शिक्षण पुणे विद्यापीठात झाले असून, जैवतंत्रज्ञान या विषयामध्ये एम.एस्सी. हा पदव्युत्तर शिक्षणक्रम पूर्ण केला आहे. ते न्यू आर्टस्‌, कॉमर्स ऍण्ड सायन्स कॉलेज, अहमदनगर येथे प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत. प्रवीण भावीनिमगाव येथील सेवानिवृत्त मुख्याध्यापक सावता गादे यांचे सुपुत्र आहे. या यशाबद्दल प्रवीण यांचे सरपंच पांडुरंग मरकड, सेवा सोसायटी अध्यक्ष मिलिंद कुलकर्णी, प्रा. त्र्यंबक जाधव, संजय काळे, ज्ञानदेव जाधव, कैलास चव्हाण, प्रशांत मरकड यांसह परिसरातून अभिनंदन होत आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)